टाटासन्सला एका नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या रतन टाटा (Ratan Tata) यांची ओळख केवळ एक यशस्वी उद्योजग म्हमूनच नाही तर, ते देशातील काही मोठे दानवीरांपैकीही एक आहेत. त्यांनी टाटा कंपनीची धुरा आपले सर्वात खास असलेले नटराजन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांच्या हाती दिली आहे. एन चंद्रशेखर यांची ओळख टाटा सन्स बरोबरच एअर इंडियाचे (Air India) चेअरमन म्हणून होते. मात्र फार कमी लोकांना माहीत आहे की, चंद्रशेखर यांच्या खाद्यावर आज ज्याकंपनीची धुरा आहे, ते कधीकाळी त्याच कंपनीत इंटर्नशिप करत होते.
कोन आहेत रतन टाटा यांचे खास एन चंद्रशेखरन -
चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 मध्ये तामिळनाडूच्या मोहनूर या गावात झाला. त्यांचे आई-वडील शेती करायचे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातील सरकारी शाळेत झाले. सुरुवातीपासूनच त्यांचा कल कंप्यूटर सायन्सकडे होता. ते अभ्यासात अत्यंत हुशार होते. यमुळेच त्यांना कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळाला. अप्लाइड सायन्सेसमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी तिरुचिरापल्ली येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विषयात पदवी मिळवली.
शेतकऱ्याचा मुलगा आज टाटाचा बॉस -
चंद्रशेखरन यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळत असे, तेव्हा तेव्हा ते आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करत असत. त्या करिअरची सुरुवात ही टाटापासूनच होते. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते 1987 मध्ये TCS मध्ये इंटर्न म्हणून जॉईन झाले होते. ज्या कंपनीत त्यांना पहिली नोकरी मिळाली होती, आज ते त्याच कंपनीत बॉस आहेत. 2007 मध्ये, त्यांना TCS च्या बोर्डावर घेण्यात आले. यानंतर, त्यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसरची (सीओओ) जबाबदारी मिळाली. यानंतर ऑक्टोबर 2009 मध्ये वयाच्या केवळ 46 व्या वर्षी ते TCS चे CEO बनले. ते कंपनीचे सर्वात तरुण सीईओ होते.
सर्वाधिक सॅलरी मिळवणारे सीईओ -
2019 मध्ये एन चंद्रशेखरन यांची सॅलरी 65 कोटी रुपये एवढी होता. यानंतर 2021-2022 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून एन चंद्रशेखरन यांना 109 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. ते भारतातील सर्वाधिक सॅलरी घेणारे सीईओ आहेत. चंद्रशेखरन यांच्या मालमत्तेसंदर्भात बोलयाचे झाल्यास, 2020 मध्ये त्याने मुंबईमध्ये 98 कोटी रुपयांचा डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता. ६००० स्क्वेअर फूट पसरात हा फ्लॅटचे पसरला आहे. चंद्रशेखन हे रतन टाटा यांचे अत्यंत विश्वासू असून, रतन टाटा यांना आपले गुरू मानतात.