मुंबई : नोटाबंदीचा दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. नोकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असे सांगत उद्योगपती राजीव बजाज यांनी शुक्रवारी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. या निर्णयाविरुद्ध लोक उभे राहिले नाहीत किंवा काही बोलले नाहीत, असेही ते म्हणाले.
बजाज आॅटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज म्हणाले की, नोटाबंदीचा औद्योगिक क्षेत्रावर प्रामख्याने परिणाम झाला आहे. बजाज आॅटोवरही नकारात्मक परिणाम झाला आहे. विशेषत: दुचाकी उद्योग आणि तीनचाकी वाहनांच्या उद्योगाला याचा फटका बसला आहे. कारण, तीनचाकी वाहने हे नगदीवर अवलंबून आहेत.
राजीव बजाज हे अशा निवडक उद्योगपतींपैकी एक आहेत ज्यांनी नोटाबंदीवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एकूण चलनातील ८६ टक्के चलन बाद ठरले होते. अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम झाला. उद्योग क्षेत्रात अनेकांचा रोजगार गेला आहे. हा आकडा पाच ते दहा हजार एवढा असू शकतो, असेही ते म्हणाले. पुण्यातील बजाज आॅटो हे तीनचाकी वाहन बनविणारे जगातील सर्वात मोठे ठिकाण आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये दुचाकींच्या विक्रीवर याचा परिणाम झाला
आहे. जानेवारीतही हा प्रभाव कायम राहिला. मागील वर्षीच्या तुलनेत वाहन विक्रीत १८ टक्के घट झाली आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
नोटाबंदीने अनेकांचे रोजगार गेले, वाहन उद्योगालाही बसला फटका
नोटाबंदीचा दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. नोकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असे सांगत उद्योगपती राजीव बजाज
By admin | Published: February 18, 2017 12:55 AM2017-02-18T00:55:03+5:302017-02-18T00:55:03+5:30