Join us

नाबार्डमध्ये निघाली असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती, दरमहा ८० हजार ते एक लाखांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 10:01 PM

NABARD Recruitment 2020: ही भरती एनएबी फाऊंडेशनसाठी आपला मुंबईतील मुख्यालयासाठी निघाली आहे. अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती...

ठळक मुद्देनाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू इच्छुक उमेदवार या पदांसाठी ७ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करू शकतातइच्छुक उमेदवारांना नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल

नवी दिल्ली - नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती एनएबी फाऊंडेशनसाठी आपला मुंबईतील मुख्यालयासाठी निघाली आहे. ही भरती कराराच्या आधारावर होईल. इच्छुक उमेदवार या पदांसाठी ७ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल.या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव असला पाहिजे. तसेच या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे वय हे ३० ते ३५ वर्षांसंदर्भात असले पाहिजे.असा करा अर्जया पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीचे नोटिफिकेशन व्यवस्थित वाचावे. तसेच त्यामध्ये मागण्यात आलेली माहिती उदाहरणार्थ शिक्षण, पात्रता आणि अनुभवासह पूर्ण तपासल्यानंतर अर्ज करा. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून फॉर्म डाउनलोड करावा. त्यानंतर हा अर्ज पूर्ण भरून careers.nabfoundation@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावा.अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होईल. मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड ही त्याची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर १: १० या प्रमाणात करण्यात येईल. तसेच रोल नंबरच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदरावारंची माहिती ही www.nabard.org या संकेतस्थळावर दिली जाईल.या भरतीप्रक्रियेमधून निवड होणाऱ्या उमेदवारांना नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटकडून ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

टॅग्स :नोकरीसरकारी नोकरीमुंबईमहाराष्ट्र