नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ... २ .. जोड ..
By admin | Published: July 12, 2015 11:56 PM
बॉक्स
बॉक्सचेंबरची सभा व निवडणूक वादात!चेंबरच्या ७१ वर्षांच्या इतिहासात यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक वादळी ठरली. चेंबरच्या माजी अध्यक्षांच्या स्टेअरिंग (सुकाणू) समितीच्या निर्देशाकडे कानाडोळा करून पहिल्यांदाच निवडणूक झाल्याचे अनेकांचे मत आहे. पूर्वी १२ जुलैला नंतर २६ जुलैला होणारी सभा शनिवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत गोंधळ उडाल्याने पुन्हा १२ जुलैला घेण्यात आली. रविवारी सभेत प्रारंभीपासूनच तणावाचे वातावरण होते. अनेक सदस्य हमरीतुमरीवर आल्याने काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. पण माजी अध्यक्षांची मध्यस्थी मोलाची ठरली. चेंबरचे उपाध्यक्ष प्रकाश मेहाडिया यांनी आपले नाव अध्यक्षपदासाठी पुढे केले. त्यातच दुसऱ्या गटाने सचिव मनुभाई सोनी यांना अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उभे केले. त्यामुळे अध्यक्ष, तीन उपाध्यक्ष आणि ३१ कार्यकारिणी सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात प्रकाश मेहाडिया सर्वाधिक मते घेऊन विजयी ठरले. उपाध्यक्षपदासाठी हेमंत गांधी, अजय मदान आणि अर्जुनदास आहुजा निवडून आले. निवडणूक अधिकारी म्हणून वीरेन चांडक यांनी काम पाहिले. त्यांना मोहन गट्टानी, रॉकी बत्रा आणि विराज साठे यांनी मदत केली.