जळगाव : सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात प्रगतीची बिजे पेरणाऱ्या दिवंगत उद्योजक डॉ. भंवरलाल जैन यांच्या जीवनकार्याला अधोरेखित करण्यासाठी व्यवस्थापन शास्त्रातले अध्वर्यू डॉ. रे गोल्डबर्ग यांनी पुढाकार घेत नभातल्या ताऱ्याला त्यांचे नाव दिले आहे. इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री या जगमान्य संस्थेने ‘लिरा रा १९एच १३एम २८एस डी ३६ ४५’ या ताऱ्याला आता भवरलाल जैन हे कायमचे नाव दिले आहे. हे नाव स्वित्झरलँडच्या ‘द रजिस्ट्रिज व्हॉल्ट’मध्ये आणि अमेरिकेमध्ये कॉपीराईट कार्यालयात नोंदणीकृत करण्यात आले आहे. संस्थेचे रजिस्ट्रार ई. एम. स्टोलपे यांनी याबाबत अधिकृत पत्र व प्रमाणपत्र जैन इरिगेशनकडे सुपूर्द केले आहे.
जागतिक पातळीवर व्यवस्थापन शास्त्रातील अध्वर्यू म्हणून ५१ वर्षीय प्रा. डॉ. रे गोल्डबर्ग हे ओळखले जातात. अमेरिकेतील हॉवर्ड बिझनेस स्कूलचे प्राध्यापक असून कृषी व्यवसाय व्यवस्थापन शास्त्राचे जागतिक प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जैन इरिगेशनने आपली व्यावसायिकता जपत सामाजिक कार्याद्वारे जो अपूर्व ठसा निर्माण केला त्याबाबत त्यांनी अभ्यास केला. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भंवरलाल जैन यांच्यावर स्वतंत्र अभ्यास करून एक विशेष असा अभ्यासक्रम अमेरिकेतील हॉवर्ड बिझनेस स्कूलच्या व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. (प्रतिनिधी)
ताऱ्याला उद्योजक भंवरलाल जैन यांचे नाव
सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात प्रगतीची बिजे पेरणाऱ्या दिवंगत उद्योजक डॉ. भंवरलाल जैन यांच्या जीवनकार्याला अधोरेखित करण्यासाठी व्यवस्थापन शास्त्रातले
By admin | Published: May 13, 2016 04:33 AM2016-05-13T04:33:50+5:302016-05-13T04:33:50+5:30