Lokmat Money > बिझनेस न्यूज > नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवण्यात येणार इन्फोसिसच्या अध्यक्षपदाची सूत्रं ?

नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवण्यात येणार इन्फोसिसच्या अध्यक्षपदाची सूत्रं ?

इन्फोसिसच्या अध्यक्षपदी सह-संस्थापक नंदन निलेकणी यांची निवड होण्याची शक्यता आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 02:23 PM2017-08-23T14:23:07+5:302017-08-23T14:30:47+5:30

इन्फोसिसच्या अध्यक्षपदी सह-संस्थापक नंदन निलेकणी यांची निवड होण्याची शक्यता आहे

Nandan Nilekani may become Infosys Head | नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवण्यात येणार इन्फोसिसच्या अध्यक्षपदाची सूत्रं ?

नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवण्यात येणार इन्फोसिसच्या अध्यक्षपदाची सूत्रं ?

मुंबई, दि. 23 - विशाल सिक्का यांनी राजनीमा दिल्यानंतर रिक्त झालेल्या इन्फोसिसच्या अध्यक्षपदी सह-संस्थापक नंदन निलेकणी यांची निवड होण्याची शक्यता आहे. सीएनबीसी-टीव्ही 18 ने सुत्रांच्या माहितीने हे वृत्त दिलं असून पुढील 24 तासात नंदन निलेकणी यांची भूमिका स्पष्ट होईल. नारायण मूर्ती यांनी तब्बेतीच्या कारणामुळे इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांसोबत होणारा कॉन्फरन्स कॉल पुढे ढकलल्यानंतर लगेचच ही माहिती मिळाली आहे. बुधवारी 6.30 वाजता हा कॉन्फरन्स कॉल होणार होता. मात्र आता 29 ऑगस्ट तारीख ठरवण्यात आली आहे. नारायण मूर्ती आणि नंदन निलेकणी यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

नंदन निलेकणी यांना परत आणणे इन्फोसिसच्या फायद्याचंच आहे असं मत माजी सीफओ व्ही बालकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. 'नंदन निलेकणी यांच्यासोबत कोणती अधिकृत चर्चा झाली आहे की नाही याबाबत मला माहित नाही. त्यांना परत यायचं आहे का हेदेखील माहित नाही. पण जर ते परत आले तर त्यांना इन्फोसिसचा अध्यक्ष बनवावे', असं व्ही बालकृष्णन बोलले आहेत. 

'सेशासयी आणि रवी वेंकटेशन यांनी शेअरहोल्डर्सचा भ्रमनिरास केला आहे, त्यामुळे त्यांनी पद सोडावं. पुढील वाटचाल करण्याआधी बोर्डाने पुनर्रचना करणं गरजेचं आहे', असं मत बालकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. नंदन निलेकणी यांना परत आणण्याचं वृत्त मिळताच मुख्य फंड मॅनेजर्स आणि स्थानिक गुंतवणूकदरांना ही योग्य निवड असल्याचं मत बोर्डाकडे व्यक्त केलं आहे. 

नंदन निलेकणी तब्बल पाच वर्ष इन्फोसिसच्या अध्यक्षपदी होते. 2007 पर्यंत त्यांनी हे पद सांभाळलं. 2009 मध्ये त्यांनी इन्फोसिसला रामराम करत युआयडीएआईचं चेअरमन पद स्विकारलं होतं. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निडवणूक लढण्यासाठी राजीनामा दिला. नंदन निलेकणी यांनी यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नंदन निलेकणी यांचे इन्फोसिसमध्ये 2.9 टक्के शेअर्स आहेत. 

विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याजागी प्रविण राव यांची तात्पुरती सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 18 ऑगस्टला झालेल्या संचालक मंडाळाच्या बैठकीत सिक्का यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. इन्फोसिसकडून पत्राव्दारे शेअर बाजाराला सिक्का यांच्या राजीनाम्याची माहिती कळवण्यात आली होती. सिक्का यांची इन्फोसिसमध्ये उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

सॉफ्टवेअर एक्सपोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुस-या क्रमांकाची कंपनी आहे. इन्फोसिसचे सीईओ म्हणून सिक्का यांनी नुकतीच तीनवर्ष पूर्ण केली होती.  कंपनीच्या कार्यालयीन कामकाज पद्धतीमध्ये झालेले बदल, नोकरी सोडणा-या कर्मचा-यांची वाढती संख्या, वेतन वाढ, कंपनी सोडणा-या कर्मचा-यांना दिले जाणारे पॅकेज यावरुन एकूणच कंपनीच्या संचालकांमध्ये नाराजी होती. कंपनीचे सहसंस्थापक नारायणमूर्ति यांना सुद्धा कंपनीमध्ये होत असलेले बदल पटत नव्हते. कंपनीचे माजी सीएफओ राजीव बंसल यांना मिळालेल्या पॅकेजवर त्यांनी आपत्ती नोंदवली होती. 

काय म्हणाले होते विशाल सिक्का
बरेच विचारमंथन केल्यानंतर मी कंपनीच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या सहका-यांना राजीनाम्याची माहिती दिली आहे असे सिक्का यांनी सांगितले. पुढची सर्व प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मी पुढचे काही महिने बोर्ड आणि व्यवस्थापकीय टीमसोबत काम करत राहीन असे सिक्का यांनी कर्मचा-यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. माझ्या तीनवर्षांच्या कार्यकाळात कंपनीने चांगली प्रगती केली. अनेक नवीन शोधांची प्रक्रिया सुरु झाली. तरीही मी सीईओ पदावर राहण्यास इच्छुक नाही असे सिक्का यांनी म्हटले आहे. पत्रामध्ये सिक्का यांनी त्यांच्यावर  अनेक आधारहीन व्यक्तीगत पातळीचे आरोप झाल्याचा उल्लेख केला आहे. 

Web Title: Nandan Nilekani may become Infosys Head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.