Join us  

'या' राज्यात दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ, प्रत्येक पॅकेटमध्ये ५० मिली जादा दूधही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 3:56 PM

दक्षिण भारतातील या राज्यातील लोकांना आता पॅकेट दुधावर अधिक खर्च करावा लागणार आहे कारण दूध महासंघाने प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे.

सर्वसामान्यांना आता दुधाने आणखी एक झटका दिला आहे. कर्नाटकातीलदूध महाग झाले आहे. कर्नाटकदूध महासंघाने नंदिनी दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. तर दुसरीकडे आता प्रत्येक पॅकेटमध्ये ५० मिली अतिरिक्त दूध मिळणार आहे. या वाढीनंतर, दुहेरी टोन्ड दुधाची किंमत १०५० मिलीसाठी प्रति लिटर ४४ रुपये होईल.

BSE सेन्सेक्स ७८ हजार पार; बँक-आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; अमारा राजा बॅटरीज टॉप गेनर

कर्नाटकमध्ये बुधवार, २६ जूनपासून नंदिनी दुधाच्या पॅकेटच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या सुधारित किमतीसह, कर्नाटक दूध महासंघाने प्रत्येक पॅकेटमध्ये ५० मिमी अतिरिक्त दूध देण्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे, एक लिटर दुधाच्या पाकिटात १०५० मिली दूध आणि अर्ध्या लिटर दुधाच्या पाकिटात ५५० मिली दूध असणार आहे.

एका वर्षाच्या आत कर्नाटकातील ही दुसरी दरवाढ आहे. गेल्या वर्षी जुलै २०२३ मध्ये कर्नाटक मिल्क फेडरेशनने दुधाच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली होती.

केएमएफने सांगितले की, चालू हंगामात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा दूध संघांमध्ये दररोज दुधाचा साठा वाढत आहे. सध्याच्या दुधाच्या साठा एक कोटी लिटरच्या आसपास आहे, दुधाला मागणीही चांगली असून दुग्धजन्य पदार्थ व दूध उद्योगातूनही मागणी जोरात आहे.

नंदिनी ब्रँड कर्नाटकात  लोकप्रिय

नंदिनी ब्रँड कर्नाटकात  लोकप्रिय आहे आणि गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी नंदिनी मिल्क हा देखील निवडणुकीतील एक मुद्दा बनला होता. याचे कारण नंदिनी आणि अमूलमधील संघर्ष होता. अमूलने जेव्हापासून कर्नाटकातील ई-कॉमर्स मार्केटद्वारे डेअरी उत्पादने ऑनलाइन विकण्याची घोषणा केली, तेव्हापासून स्थानिक हितसंबंधांवर परिणाम होत असल्याचे कारण देत राज्यात वाद सुरू झाला.

कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढ

कर्नाटक राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये आणि डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ केली आहे. 'कर्नाटक सेल्स टॅक्स' (KST) मध्ये दुरुस्ती केल्यानंतर ही वाढ झाली आहे. कर्नाटक राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलवरील विक्रीकरात २९.८४ टक्के आणि १८.४ टक्के वाढ केली आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढीवरून भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत खटाखट, टकाटक लूट सुरू झाल्याचे म्हटले आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, कर्नाटकात परिस्थिती बदलत आहे. याचबरोबर पेट्रोल ३ रुपयांनी महागले आहे. तर टकाटक-टकटक डिझेल ३.२० रुपयांनी महागले आहे.

टॅग्स :दूधकर्नाटक