Join us  

फक्त ५ तासात ५३५ कोटींची कमाई, मुलाने २३७ कोटी मिळवले; चंद्राबाबू नायडूंच्या पत्नी काय करतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 4:31 PM

देशात लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले आहे. आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सरकारमध्ये टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांचाही सहभाग असणार आहे.

देशात लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले आहे. आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत,  या सरकारमध्ये टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांचाही सहभाग असणार आहे. लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी मोठं यश मिळवले आहे. या निकालामुळे चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी आणि मुलाने  गेल्या पाच दिवसांत बंपर कमाई केली आहे. चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाला पाच दिवसांत मोठी कमाई एका कंपनीमुळेच झाली आहे. या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी भरपूर पैसेही कमावले आहेत.

चंद्राबाबू नायडूंचा पक्ष टीडीपीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी केली आहे, यामुळे एनडीएल'ला केंद्रात बहुमत मिळाले आहे आणि टीडीपी आंध्र प्रदेशात आपले सरकार बनवणार आहे. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू १२ जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. दोन्ही निवडणुकांमध्ये टीडीपीच्या चांगल्या कामगिरीमुळे नायडू यांच्याशी संबंधित कंपनीने शेअर मार्केटमध्येही वाढ नोंदवली आहे. 

हेरिटेज फूड्सची स्थापना केली

नायडू यांच्या पत्नीने १९९२ मध्ये हेरिटेज फूड्सची स्थापना केली होती, याचे शेअर्स बाजारात लिस्टेड केले आहेत. या कंपनीचे शेअरने ५ दिवसांत ५५ टक्क्यांची उसळी घेतली आहे. नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी या कंपनीतील मोठ्या समभागधारक आहेत, त्यांच्याकडे या कंपनीचे २,२६,११,५२५ समभाग आहेत. पाच दिवसांत शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे त्याच्या संपत्तीत ५३५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांच्याकडेही हेरिटेज फूड्स लिमिटेडचे ​​१,००,३७,४५३ शेअर्स आहेत. ३ जून रोजी हा शेअर ४२४ रुपयांवर व्यवहार करत होता, तर शुक्रवारी हेरिटेज फूड्सचा शेअर ६६१.२५ रुपयांवर पोहोचला. या प्रचंड वाढीमुळे त्यांच्या मुलाच्या संपत्तीत २३७.८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी या तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि तेलुगु देसम पार्टी संस्थापक एनटी रामाराव यांच्या कन्या आहेत. राजकारणात सक्रीय असण्यासोबतच त्या हेरिटेज फूड्स कंपनीतही मोठ्या शेअरहोल्डर आहेत.

हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे नायडू कुटुंबाच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसई शेअरहोल्डिंगनुसार, कंपनीमध्ये मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाची एकूण हिस्सेदारी ३५.७१% आहे, जी ३,३१,३६,००५ समभागांच्या समतुल्य आहे. गेल्या पाच दिवसांत प्रत्येक शेअरमध्ये २३७ रुपयांची वाढ झाली आहे. या स्थितीत एकूण नफा ७८५ कोटी रुपये झाला आहे.

टॅग्स :चंद्राबाबू नायडूभाजपालोकसभा निवडणूक २०२४व्यवसाय