लंडन : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता यांनी ब्रिटनमधील कर सवलतीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप होत असून विरोधी पक्षांनी अक्षता यांचे पती तथा ब्रिटनचे वित्तमंत्री ऋषी सुनक यांनी तत्काळ स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
अक्षता यांचा जन्म भारतात झाला आहे. त्यामुळे त्यांनी अनिवासी ब्रिटिश दाखवून कर सवलत लाटल्याचा आरोप आहे. यासंबंधीच्या बातम्या ब्रिटिश माध्यमांनी दिल्यानंतर विरोधी पक्ष लेबर पार्टी पुढे सरसावली आहे. अक्षता यांची कर स्थिती ‘अनिवासी’ असल्यामुळे विदेशात कमावलेल्या संपत्तीवर ब्रिटनमध्ये कर देण्याचे बंधन त्यांच्यावर नाही. यालाच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मात्र अक्षता यांनी करसवलत घेतल्याचा आरोप फेटाळला आहे.
नारायण मूर्तींच्या मुलीने घेतला ब्रिटनमधील कर सवलतीचा गैरफायदा?
Narayan Murthy's daughter : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता यांनी ब्रिटनमधील कर सवलतीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप होत असून विरोधी पक्षांनी अक्षता यांचे पती तथा ब्रिटनचे वित्तमंत्री ऋषी सुनक यांनी तत्काळ स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 05:39 AM2022-04-08T05:39:45+5:302022-04-08T05:40:22+5:30