Join us

सुशिक्षित लोक अतिरिक्त काम हे दुर्दैव मानतात; नारायण मूर्ती पुन्हा ७० तासांच्या कामावर बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 4:53 PM

गेल्या काही दिवसापूर्वी नारायण मूर्ती ७० तासांच्या कामाबाबत केलेल्या विधानावरुन ट्रोल झाले होते.

गेल्या काही दिवसापूर्वी आयटी कंपनी  इन्फोसिसचे  संस्थापक नारायण मूर्ती दररोज ७० तासांच्या कामाच्या विधानावरुन ट्रोल झाले होते. आता मूर्ती यांनी पुन्हा एकदा या विधानाचा संदर्भ दिला आहे. मूर्ती यांनी आता एका मुलाखतीत म्हटले आहे की, देशातील सुशिक्षित लोकांना वाटते की जास्त काम करणे दुर्दैवी आहे. भारतात जास्त काम करणे सामान्य आहे. देशातील शेतकरी आणि मजूर खूप कष्ट करतात. देशात ही एक सामान्य गोष्ट आहे आणि बहुतेक लोक असे आहेत, जे अंगमेहनतीने पैसे कमवतात, असंही मूर्ती म्हणाले. 

Closing Bell : सेन्सेक्स ७२ हजारांपार, निफ्टी २१७१० अंकांवर बंद; बँकिंग शेअर्समध्ये घसरण

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, 'आमच्यापैकी ज्यांनी मोठ्या सवलतीत शिक्षण घेतले त्यांनी सरकारचे आभार मानले पाहिजेत. आपण किती भाग्यवान देश आहोत याचा विचार केला पाहिजे की आपल्याला फार कष्ट करावे लागले नाहीत. जेव्हा मी आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला तेव्हा सोशल मीडियावर खूप विरोध झाला. मला चुकीचे म्हणणारे बरेच लोक होते. काही चांगल्या लोकांनी माझे कौतुक केले. विशेषत: परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी मी बरोबर असल्याचे सांगितले.

नारायण मूर्ती म्हणाले, 'जर कोणी त्याच्या क्षेत्रात माझ्यापेक्षा चांगला असेल तर मी त्याचा आदर करतो. मी त्याला विचारेन की मी जे बोललो ते चुकीचे आहे का? मला नाही वाटत. माझे अनेक मित्र जे पाश्चिमात्य देशांमध्ये राहतात आणि त्यांच्यापैकी मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय आहेत त्यांनी सांगितले की तुम्ही बरोबर आहात आणि आम्हाला त्याचा आनंद आहे. त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी सांगितले होते की, नारायण मूर्ती यांनी त्यांना ७० तास काम करण्याचा सल्ला दिला असला तरी ते स्वत: आठवड्यातून ९० तास काम करत होते.

नारायण मूर्ती म्हणाले की, ज्यावर मी स्वतः काम केले नाही, असा कोणताही सल्ला मला द्यायचा नाही. आठवड्यातून ८५ ते ९० तास काम करणे हा माझा दिनक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. मूर्ती म्हणाले, 'मी सहा ते साडेसहा दिवस काम करायचो. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातही काम करत असे. मी रोज सकाळी ६ वाजता घरून निघायचो. सकाळी ६:२० वाजता ऑफिसमध्ये असायचो. यानंतर सायंकाळी साडेआठपर्यंतच निघावे लागले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी देशातील तरुणांना आवाहन केले होते की, आपल्याला चीनसारख्या देशाच्या पुढे जायचे असेल तर आपल्याला दररोज ७० तास काम करण्याची सवय लावावी लागेल, या विधानावर ते सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. 

टॅग्स :नारायण मूर्तीइन्फोसिस