Join us

नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:16 PM

Ratan Tata Narayana Murthy दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या कार्यातून आणि सामाजिक कार्यातून देशातील अनेक लोकांच्या जीवनावर ठसा उमटवला. यामध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचाही समावेश आहे.

दिवंगत उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी आपल्या कार्यातून आणि सामाजिक कार्यातून देशातील अनेक लोकांच्या जीवनावर ठसा उमटवला. यामध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांचाही समावेश आहे. रतन टाटांच्या मूल्यांचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाल्याचं मूर्ती यांनी म्हटलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी रतन टाटांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी केवळ व्यवसायिक जगतावरच नाही, तर वैयक्तिक संबंधांवर आणि सामाजिक मूल्यांवरही प्रभाव टाकल्याचं मूर्ती म्हणाले.

रतन टाटा हे एक दयाळू व्यक्ती आणि जीवनाचे खरे मूर्त रुप होते, असं म्हटलं. "टाटांना सर्वांप्रतीच सहानुभूती होती. जनतेला परवडणाऱ्या दरात चांगली गाडी उपलब्ध करून देण्यासाठी टाटांनी नॅनोचे स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं, हे त्यांच्या समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष आहे," असं मूर्तींनी नमूद केलं. रतन टाटा हेच पहिले व्यक्ती होते, ज्यांनी भारतीयदेखील आपल्या कारचं उत्पादन करू शकतात, याचं स्वप्न पाहिलं होतं. देशाप्रती त्यांचं प्रेम उल्लेखनीय असल्याचंही ते म्हणाले.

... जेव्हा मुलीची भेट करुन दिली

१९९९ मध्ये नारायण मूर्तींनी आपल्या मुलीची भेट रतन टाटा यांच्याशी करुन दिली होती. यावेळचाही किस्सा त्यांनी सर्वांना सांगितला. ती भेट ३ तास सुरू होती. यादरम्यान, त्यांनी नेतृत्वाची मूल्यं समजावून सांगितली. त्या भेटीनं माझ्या मुलीला तसंच मला आणि सुधा मूर्ती यांना नेतृत्वाचे धडे मिळाल्याचे नारायण मूर्ती म्हणाले.

जेआरडी टाटांचीही आठवण

मुलाखतीदरम्यान नारायण मूर्तींनी जेआरडी टाटा यांच्यासोबतचाही एक किस्सा सर्वांना सांगितला. जेव्हा ते जेआरडी टाटांची भेट घेण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी सुधा मुर्तींना अंधारात टॅक्सीची वाट पाहताना पाहिलं. त्यांनी त्यांनी मला बोलावलं आणि भविष्यात कधीही आपल्या पत्नीला अंधारात वाट पाहू देऊ नका, असं सांगितलं. त्यांच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचं किती महत्त्व होतं आणि ते त्यांच्या महानतेचं प्रतीक होतं, असं मूर्तींनी नमूद केलं.

टॅग्स :रतन टाटानारायण मूर्तीव्यवसाय