Join us  

नारायण मूर्तींनी तिरुपती मंदिरात दान केला २ किलो सोन्याचा शंख आणि कासव, किंमत ऐकून व्हाल अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 11:27 AM

इन्फोसिसचे अध्यक्ष एन. नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांनी तिरुपती बालाजी मंदिरात शंख आणि कासवाची सोन्याची मूर्ती दान केली आहे.

देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Infosys founder Narayana Murthy) आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murty)  तिरुमला तिरुपती देवस्थानम येथे दर्शन घेतलं. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा शंख आणि सोन्याची कासवाची मूर्ती दान केली. या दोन्हीचं वजन सुमारे २ किलो आहे. सुधा मूर्ती या यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टच्या सदस्याही होत्या. 

नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी दान केलेला शंख तसंच कासवाची मूर्ती तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टचे सदस्य ईओ धर्मा रेड्डी यांच्याकडे सुपूर्द केली. या खास प्रसंगी दोघेही मंदिराच्या रंगनायकुला मंडपममध्येही गेले. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी दिलेला सोन्याचा शंख आणि कासवाची मूर्ती अतिशय खास आहे. या दोन्हीची खास रचना करण्यात आली आहे. या दोन्हींचा उपयोग स्वामी अम्मावार यांच्या अभिषेकात केला जातो. मूर्ती दाम्पत्यानं केलेल्या या दानाला 'भूरी' दान असंही म्हणतात. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या बाजारात सोन्याची सरासरी किंमत ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दान केलेल्या सोन्याच्या शंख आणि कासवाच्या मूर्तीचे वजन सुमारे २ किलो आहे. दरम्यान, त्यांची किंमत सुमारे १.५० कोटी रुपये आहे.

टॅग्स :इन्फोसिसनारायण मूर्तीसुधा मूर्ती