Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC IPO च्या लॉन्चिंग डेटसंदर्भात नवी अपडेट; मोदी सरकार उभे करणार 50 हजार कोटी रुपये!

LIC IPO च्या लॉन्चिंग डेटसंदर्भात नवी अपडेट; मोदी सरकार उभे करणार 50 हजार कोटी रुपये!

SEBI कडे नवीन कागदपत्रे दाखल न करता IPO लॉन्च करण्यासाठी सरकारकडे 12 मेपर्यंतचाच वेळ आहे. या मुदतीपर्यंत आयपीओ लॉन्च केला गोला नाही, तर कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:35 PM2022-04-05T19:35:09+5:302022-04-05T19:37:05+5:30

SEBI कडे नवीन कागदपत्रे दाखल न करता IPO लॉन्च करण्यासाठी सरकारकडे 12 मेपर्यंतचाच वेळ आहे. या मुदतीपर्यंत आयपीओ लॉन्च केला गोला नाही, तर कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागतील.

Narendra Modi govt to seek RS 50000 cr next month from ILC IPO Know the detail | LIC IPO च्या लॉन्चिंग डेटसंदर्भात नवी अपडेट; मोदी सरकार उभे करणार 50 हजार कोटी रुपये!

LIC IPO च्या लॉन्चिंग डेटसंदर्भात नवी अपडेट; मोदी सरकार उभे करणार 50 हजार कोटी रुपये!

आपण लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या IPOची वाट बघत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, एलआयसीचा आयपीओ पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात लॉन्च होणार आहे. या IPO च्या माध्यमातून मोदी सरकार तब्बल 50,000 कोटी रुपये उभे करणार आहे.

महत्वाचे म्हणजे, SEBI कडे नवीन कागदपत्रे दाखल न करता IPO लॉन्च करण्यासाठी सरकारकडे 12 मेपर्यंतचाच वेळ आहे. या मुदतीपर्यंत आयपीओ लॉन्च केला गोला नाही, तर कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागतील.

अहवालानुसार, सरकार IPO च्या माध्यमाने LIC मधील 7% हिस्सा विकण्यासंदर्भात चर्चा करत आहे. असे झाल्यास भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील LIC चा IPO हा सर्वात मोठा IPO ठरेल. आतापर्यंत, 2021 मध्ये पेटीएमच्या आयपीओमधून जमा झालेली रक्कम सर्वाधिक होती. पेटीएमने IPO मधून 18,300 कोटी रुपये जमा केले होते. यानंतर कोल इंडियाच्या IPO (2010) मधून सुमारे 15,500 कोटी रुपये आणि रिलायन्स पॉवर (2008) मधून 11,700 कोटी रुपये जमवण्यात आले होते.

रिलायन्स-टीसीएसला टक्कर - 
एकदा सूचीबद्ध झाल्यानंतर, LIC चे बाजार भांडवल रिलायन्स इंडस्ट्रीज आणि TCS सारख्या शीर्ष कंपन्यांच्या बरोबरीत असेल. रिलायन्सचे बाजार भांडवल 18 लाख कोटी रुपये एवढे आहे. तर TCS चे बाजार भांडवल सुमारे 14 लाख कोटी रुपये एवढे आहे.

Web Title: Narendra Modi govt to seek RS 50000 cr next month from ILC IPO Know the detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.