Join us  

नरेंद्र मोदींच्या विजयानं भरला राहुल गांधींचा खिसा, केवळ 3 दिवसांत झाला लाखो रुपयांचा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 10:13 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयामुळे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाही जबरदस्त फायदा होताना दिसत आहे...

लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या विजयानंतर, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होत आहेत. यामुळे शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. बाजार सातत्याने वधारताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयामुळे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाही जबरदस्त फायदा होताना दिसत आहे. शेअर बाजारात येत असलेल्या तेजीमुळे त्यांचा पोर्टफोलिओही पुढे जाताना दिसत आहे. राहुल गांधी यांचा स्टॉक पोर्टफोलिओ जवळपास 3.5 टक्क्यांनी वधारला आहे.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आहे राहुल गांधींची गुंतवणूक -खरे तर, राहुल गांधींकडे बऱ्याच कंपन्यांचे शअर्स आहेत. यात, इंफोसिस, एलटीआय माइंड ट्री, टीसीएस, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि पिडिलाइट इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक काळात भरलेल्या उमेदवारी अर्जातून ही माहिती मिळते. हे सर्व, बाजारातील दिग्गज कंपन्यांचे शेअर म्हणून ओळखले जातात. 

निवडणूक निकालापूर्वीच्या सोमवारी बाजारात आलेल्या तेजीमुळे राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 3.45 लाख रुपयांची वाढ झाली होती. निवडणूक निकालाच्या दिवशी अर्थात मंगळवारी त्यांनाही मोठे नुकसान झाले होते. त्यांचा पोर्टफोलिओ जवळपास 4.08 लाख रुपयांनी घसरला होता.

बुधवारपासून सातत्याने वाढतोय राहुल गांधींचा पोर्टफोलिओ - यानंतर बुधवारपासून शेअर बाजारात तेजी यायला सुरुवात झाली. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, 5 जूनला राहुल गांधींचा पोर्टफोलिओ जवळपास 13.9 लाख रुपयांनी वधारला. यात 6 जूनलाही जवळपास 1.78 लाख रुपयांची तेजी आली. राहुल गांधींचा पोर्टफोलियो 31 मेपासून आतापर्यंत 3.46 टक्क्यांनी वधारला आहे. त्यांना जवळपास 15 लाख रुपयांचा फायदा झाला आहे.

या आठवड्यात शेअर बाजारात मोठा चढ-उतार - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी अर्थात 4 जून 2024 रोजी सत्ताधारी भाजपला बहुमत न मिळाल्याने गुंतवणूकदारांचे तब्बल 31 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, पुढील तीन व्यवहारांच्या सत्रातच बाजार वेगाने रिकव्हर झाला. गुंतवणूकदारांची संपत्ती 28.66 लाख कोटी रुपयांनी वधारली आहे. 

 

टॅग्स :राहुल गांधीनरेंद्र मोदीशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक