मुंबई : जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता यांना देशाबाहेर जाण्यास परवानगी नाकारल्याची माहिती शनिवारी इमीग्रेशन अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर दिली. दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी संबंधित विमानाचे उड्डाण होणार होते. अनिता गोयल यांच्या नावाने असलेल्या बॅग्ज विमानातून बाहेर काढण्यात आल्या. जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन दिले नसल्याने कर्मचाºयांच्या संघटनेने त्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची विनंती मुंबई पोलिसांना केली होती.
नरेश गोयल यांना देशाबाहेर जाताना अडविले
जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता यांना देशाबाहेर जाण्यास परवानगी नाकारल्याची माहिती शनिवारी इमीग्रेशन अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर दिली.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:21 AM2019-05-26T06:21:12+5:302019-05-26T06:21:19+5:30