Lokmat Money > बिझनेस न्यूज > नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी

नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी

मुंबई उच्च न्यायालयाने नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 04:55 PM2024-05-06T16:55:57+5:302024-05-06T17:01:24+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Naresh Goyal will have to get 2 months bail in money laundering case | नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी

नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. 

न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्या खंडपीठाने सांगितले की, गोयल यांना एक लाख रुपयांचा जामीन भरावी लागेल आणि विशेष न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय ते मुंबई सोडणार नाहीत. गोयल यांना त्यांचा पासपोर्ट जमा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

यापूर्वी, ईडीने नरेश गोयल यांच्या अंतरिम जामीन अर्जाला विरोध केला होता. ईडीने सांगितले होते की, त्यांचा खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा कालावधी एक महिन्याने वाढवला जाऊ शकतो. नरेश गोयल यांनी आरोग्यच्या कारणास्तव अंतरिम जामीन मागितला होता, कारण ते आणि त्यांची पत्नी कर्करोगाने ग्रस्त आहेत.

काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी

गेल्या फेब्रुवारीमध्ये विशेष न्यायालयाने नरेश गोयल यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, न्यायालयाने त्याला त्याच्या आवडीच्या खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची परवानगी दिली होती. यानंतर गोयल यांनी अंतरिम जामिनासाठी एप्रिलमध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

ED ने सप्टेंबर २०२३ मध्ये गोयल यांना मनी लाँड्रिंग आणि जेट एअरवेजला कॅनरा बँकेने कर्ज म्हणून दिलेल्या ५३८.६२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर गोयल यांची पत्नी अनिता गोयल यांना नोव्हेंबर २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. अनिता यांना अटकेच्या दिवशी त्यांच्या वयाच्या आणि वैद्यकीय स्थितीच्या आधारावर विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता परंतु विशेष न्यायालयाने गोयल यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार दिले जात असल्याच्या कारणावरुन जामीन नाकारला होता.

Web Title: Naresh Goyal will have to get 2 months bail in money laundering case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.