- सोलापूर, ठाणे, उल्हासनगर पालिका प्रत्युत्तर सादर करणारमुंबई : नाशिक महापौर निधीचे सर्व व्यवहार गोठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी प्रशासानाला दिले़ याआधी न्यायालयाने पुणे महापौर निधीचे व्यवहार गोठवण्याचे आदेश दिले आहेत़सोलापूर, ठाणे व उल्हासनगर महापालिका निधीचा सविस्तर तपशील न्यायालयासमोर ठेवणार आहेत़ त्यात गैरप्रकार आढळल्यास तेथील महापौर निधीही न्यायालयाकडून गोठवले जातील़ महापौरांच्या नावे निधी गोळा करण्याचे अधिकार कोणालाच नाहीत़ तसे करायचे असल्यास त्याची नोंद धर्मादाय आयुक्तांकडे करणे बंधनकारक आहे़ मात्र वरील कोणत्याच महापौर निधीची नोंद नाही आणि त्याद्वारे पैसे गोळा करून खर्च केले जात आहेत़ हे बेकायदा असून या निधीद्वारे सुरू असलेले सर्व व्यवहार गोठवावेत़ तसेच आतापर्यंत या माध्यमातून खर्च झालेले पैसे संबंधितांकडून वसुल करावेत, अशी मागणी करणारी याचिका महेंद्र धावडे यांनी ॲड़ एस़ एस़ पटवर्धन यांनी दाखल केली आहे़पुणे पालिकेत हा निधी धर्मादाय आयुक्तांकडे कोणतीही नोंद करता वापरत असल्याचे स्पष्ट झाले़ त्यापाठोपाठ गुरूवारी नाशिक पालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करून अशाच प्रकारची कबुली दिली़ अमरावती पालिकेने हा निधी २०१० मध्ये बंद केल्याचे स्पष्ट केले़ प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे़ (प्रतिनिधी)
नाशिक महापौर निधी हायकोर्टाने गोठवला
By admin | Published: October 30, 2014 10:58 PM