Lokmat Money > बिझनेस न्यूज > नस्ली वाडिया यांना संचालक मंडळावरून हटवलं

नस्ली वाडिया यांना संचालक मंडळावरून हटवलं

विशेष सर्वसाधारण सभेत 90.8 टक्के शेअरहोल्डर्सनी नस्ली वाडीया यांना तात्काळरित्या पदावरुन हटवण्यात येण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मत दिलं

By admin | Published: December 22, 2016 11:04 AM2016-12-22T11:04:08+5:302016-12-22T11:04:08+5:30

विशेष सर्वसाधारण सभेत 90.8 टक्के शेअरहोल्डर्सनी नस्ली वाडीया यांना तात्काळरित्या पदावरुन हटवण्यात येण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मत दिलं

Nasli Wadia was removed from the board of directors | नस्ली वाडिया यांना संचालक मंडळावरून हटवलं

नस्ली वाडिया यांना संचालक मंडळावरून हटवलं

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - नस्ली वाडिया यांना टाटा स्टीलच्या संचालक मंडळावरून हटवण्यात आलं आहे. टाटा स्टीलने ही माहिती दिली आहे. विशेष सर्वसाधारण सभेत नस्ली वाडिया यांना संचालक मंडळावरून हटवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 90.8 टक्के शेअरहोल्डर्सनी यावेळी नस्ली वाडीया यांना तात्काळरित्या पदावरुन हटवण्यात येण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मत दिलं. तर विरोधात फक्त 9.20 टक्के शेअरहोल्डर्स होते.  
दरम्यान नस्ली वाडिया यांना मला हटविण्यासाठी टाटा सन्सने माझ्यावर खोटे आणि तथ्यहिन आरोप लावल्याचा आरोप केला आहे. बोर्डाने महत्वाचे निर्णय घेताना मला विश्वासात न घेता बाजूला ठेवलं असल्याचाही आरोप त्यांनी केला. नॅनो प्रकल्प बंद करण्यात केलेला उशीर हा कंपनीसाठी तोट्याचा ठरला असल्याचंही ते बोलले आहेत.
 

Web Title: Nasli Wadia was removed from the board of directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.