नवी दिल्ली : नॅशनल हायवे अॅथॉरिटी व्यवसायवाढीसाठी ४०,००० कोटी उभे करणार आहे. ही रक्कम ६०,००० कोटीचे हायवे तारण ठेवून नॅशनल हायवे अॅथॉरिटी उभारणार, असे रस्ते वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. नॅशनल हायवे अॅथॉरिटीजकडे सध्या ६०,००० कोटींचे पूर्ण झालेले हायवे प्रकल्प आहेत. त्यातून ४०,००० कोटी उभे होणार आहेत. संपूर्ण झालेले प्रकल्प तारण ठेवून अनेक कॉर्पोरेट कंपन्या व्यवसायवाढीसाठी भांडवल उभे करत असतात. याला इंग्रजीत अॅसेट मॉनटायझेशन म्हणजे संपत्तीचे मौद्रिकीकरण म्हणतात. यामध्ये पूर्ण झालेले प्रकल्प एका गुंतवणूक न्यासाकडे (इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) तारण म्हणून दिले जातात. गुंतवणूक न्यास त्या तारणावर कंपन्यांना ६० ते ८० टक्केपर्यंत रक्कम त्वरित देतात. अशा प्रकारे संपत्ती मौद्रिकीकरण पूर्ण होते.दुसऱ्या टप्प्यात न्यास हे प्रकल्प संचालन करण्यासाठी खासगी कंपन्यांना देतात आणि त्यातून मिळणाºया रकमेतून कंपनीला दिलेली रक्कम वसूल करतात व संबंधित प्रकल्प पुन्हा मूळ कंपनीला परत करतात. आतापर्यंत अशा प्रकारे भांडवल उभे करण्याची परवानगी फक्त कंपन्यांना होती. गेल्या महिन्यात केंद्रीय मंंत्रिमंडळाने नॅशनल हायवेचे संपत्ती मौद्रिकीकरण होणार आहे.
नॅशनल हायवे अॅथॉरिटी उभारणार ४० हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 3:25 AM