Lokmat Money > बिझनेस न्यूज > आत्मनिर्भर भारत! आता पेट्रोल-डिझेल विसरा; शेणापासून तयार करणार स्वस्त इंधन

आत्मनिर्भर भारत! आता पेट्रोल-डिझेल विसरा; शेणापासून तयार करणार स्वस्त इंधन

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून आता गाईच्या शेणापासून इंधन तयार करण्याचा सल्ला राष्ट्रीय कामधेनू आयोगाने दिला आहे.

By देवेश फडके | Published: February 23, 2021 02:04 PM2021-02-23T14:04:42+5:302021-02-23T14:10:00+5:30

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून आता गाईच्या शेणापासून इंधन तयार करण्याचा सल्ला राष्ट्रीय कामधेनू आयोगाने दिला आहे.

national kamadhenu commission proposes to use cow dung cng on fuel price hike | आत्मनिर्भर भारत! आता पेट्रोल-डिझेल विसरा; शेणापासून तयार करणार स्वस्त इंधन

आत्मनिर्भर भारत! आता पेट्रोल-डिझेल विसरा; शेणापासून तयार करणार स्वस्त इंधन

Highlightsभारतात बनलेले स्वस्त इंधन मिळणारगायींपासून विविध उद्योगांना चालना देणारशेणापासून बायोगॅसची निर्मिती करून सीएनजी पंप

नवी दिल्ली :पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून आता गाईच्या शेणापासून इंधन तयार करण्याचा सल्ला राष्ट्रीय कामधेनू आयोगाने दिला आहे. (national kamadhenu commission proposes to use cow dung cng on fuel price hike)

वाढत्या इंधनदरांमुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही हिरवा कंदील दर्शवण्यात आला आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गायीच्या शेणापासून बनलेल्या नॅच्युरल गॅस CNG चा उपयोग करण्याचा उपाय सुचवत गायीच्या शेणापासून बनणारा गॅस स्वस्त आणि मेड इन इंडिया आहे, असे कामधेनू आयोगाने म्हटले आहे. 

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या, आजचे दर...

भारतात बनलेले स्वस्त इंधन

बायोगॅसचा वापर इंधनाच्या रुपाने अनेक वर्षांपासून केला जातो. हा गॅस सिलिंडरमध्ये भरला जातो आणि त्याचा वापर केला जातो. शेणापासून निर्माण झालेल्या ऊर्जेचा उपयोग गाड्यांमध्येही केला जाऊ शकतो. यातून मोठ्या प्रमाणात बायोगॅसची निर्मिती करून सीएनजी पंप उभा केला, तर परिवहन उद्योगासाठी भारतात बनलेले स्वस्त इंधन उपलब्ध होऊ शकते, असा दावा कामधेनून आयोगाकडून करण्यात आला आहे. 

विविध उद्योगांना चालना

गायींपासून विविध उद्योगांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आयोगाच्या अनेक वेबिनारमध्ये गायीशी निगडीत उद्योगांबाबत चर्चा झाली. जागतिक पातळीवरील उद्योजकांच्या नव्या-जुन्या कल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर करून गायीच्या शेणापासून इंधन तयार करण्याच्या शक्यतांवर काम सुरू केल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. 

दरम्यान, दोन दिवस विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका दिला आहे. मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९९.४५ रुपये झाला आहे. सलग १२ दिवस कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. या १२ दिवसात पेट्रोल ३.२८ रुपयांनी आणि डिझेल ३.४९ रुपयांनी महागले होते. 

Web Title: national kamadhenu commission proposes to use cow dung cng on fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.