नवी दिल्ली : नॅशनल रिटेल पॉलिसी सेक्टरमध्ये नवसंजीवनी निर्माण होऊ शकते. यामुळे देशात 2024 पर्यंत 30 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सीआयआय इंडिया रिटेल समिट -२०२० (CII India Retail Summit 2020) मध्ये नॅशनल कमिटीचे चेअरमन शाश्वत गोयंका यांनी म्हटले आहे. गोयंका हे आरपी-संजीव गोयंका समूहाचे (रिटेल आणि एफएमसीजी) प्रमुखही आहेत. उद्योगाच्या अंदाजानुसार, देशातील संघटित रिटेल सेक्टरमध्ये पाच कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे.
पुढील काळात जेव्हा उद्योग आपल्या खालच्या स्तरावरून उभारेल. अशावेळी सुधारणेची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी नवीन आणि उदयोन्मुख मॉडेल्सवर चर्चा करणे आवश्यक आहे. उद्योग आतापर्यंत मागणीत कमी असल्यामुळे झालेल्या तोट्यामुळे अजून उभारला नाही आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी सक्रिय पावले उचलणे आवश्यक आहे, असे शाश्वत गोयंका यांनी सांगितले.
याचबरोबर, या क्षेत्राच्या विविध स्वरुपामधील आव्हाने व अडथळे दूर करण्यासाठी सीआयआयच्या अंतर्गत किरकोळ क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे की सरकारने एक मजबूत रिटेल पॉलिसी आणली पाहिजे.आज पूर्वीपेक्षा जास्त नॅशनल रिटेल पॉलिसीसह अनुकूल वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे शाश्वत गोयंका म्हणाले. तसेच, सरकारने मजबूत रिटेल पॉलिसी आणून या क्षेत्राची ग्रोथ वाढू शकते. यामुळे 2024 पर्यंत 30 लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्याशिवाय, या संबंधित क्षेत्रात अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतात, असे शाश्वत गोयंका यांनी सांगितले.
6,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे 2-3 लाख अतिरिक्त रोजगार उपलब्ध होतीलरिसर्चवरून समजले की रिटेलशी संबंधित मूलभूत पायाभूत सुविधांसह वेअरहाऊस आणि कोल्ड स्टोरेज इत्यादींमध्ये केवळ 6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन दोन ते तीन लाख अतिरिक्त रोजगार निर्मिती केली जाऊ शकते, असे शाश्वत गोयंका म्हणाले. दरम्यान, याच कार्यक्रमात उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) सहसचिव अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, सरकार रिटेल पॉलिसीवर काम करत आहे.