Lokmat Money > बिझनेस न्यूज > चार वर्षांमध्ये मुद्रा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँका अक्षरश: गाळात!

चार वर्षांमध्ये मुद्रा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँका अक्षरश: गाळात!

देशातली प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँक आज जखमी अवस्थेत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आपले कष्टाचे पैसे ठेवणे सुरक्षित आहे की नाही, याविषयी सामान्य माणसाला प्रथमच शंका वाटू लागलीय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:15 AM2018-05-28T02:15:30+5:302018-05-28T02:15:30+5:30

देशातली प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँक आज जखमी अवस्थेत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आपले कष्टाचे पैसे ठेवणे सुरक्षित आहे की नाही, याविषयी सामान्य माणसाला प्रथमच शंका वाटू लागलीय.

Nationalized banks with Mudra banks in trouble | चार वर्षांमध्ये मुद्रा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँका अक्षरश: गाळात!

चार वर्षांमध्ये मुद्रा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँका अक्षरश: गाळात!

- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली - देशातली प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँक आज जखमी अवस्थेत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आपले कष्टाचे पैसे ठेवणे सुरक्षित आहे की नाही, याविषयी सामान्य माणसाला प्रथमच शंका वाटू लागलीय. मोदी सरकारच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीत भारतातल्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या एनपीएने आजवरच्या इतिहासातले शिखर गाठले आहे. पंतप्रधान मोदींंचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली मुद्रा बँकदेखील याला अपवाद नाही.
मार्च २0१४ मधे सर्व अधिसूचित बँकांचा एकत्रित एनपीए ४.१0 टक्के होता. सप्टेंबर २0१७ पर्यंत तो १0.२१ टक्क्यांवर पोहोचलाय. बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी योजलेले आॅपरेशन इंद्रधनुष्य सध्या शोचनीय स्थितीत आहे. अनेक बँकांवर झालेला आघात तर इतका मोठा आहे की, पुढची अनेक वर्षे तरी या जखमा भरून निघणे शक्य दिसत नाही.

मुद्रा बँकेचा एनपीए १४ हजार ३५८ कोटी
पंतप्रधानांचा स्वप्नांकित प्रकल्प मुद्रा बँकेच्या कर्जाचा एनपीए वाढत चालल्याने सरकारची झोप उडाली आहे. मुद्रा बँकेच्या कर्जाचा एनपीए
14358
कोटींवर पोहोचला. या कर्जाची परतफेड होण्याची शक्यता फारच कमी आहे. ही रक्कम एनपीएचा एकूण आकडा आणखी वाढवील. एनपीए रोखण्याचे मोठे आव्हान अर्थ मंत्रालय व बँकांसमोर आहे.

एनपीएचा डोंगर असा वाढला
नोटाबंदीच्या निर्णयाच्या अगोदर व नंतर अशा
सहा तिमाहींमध्ये बँकांचा एनपीए कसा व किती
वाढत गेला, याची आकडेवारी
आर्थिक तिमाही एनपीए रक्कम (कोटीत) एनपीए रेशो
मार्च २0१६ ५ लाख ७१ हजार ८४१ ७.६९%
जून २0१६ ६ लाख १८ हजार १0९ ८.४२%
सप्टेंबर २0१६ ६ लाख ५१ हजार ७९२ ८.८१%
डिसेंबर २0१६ ६ लाख ७७ हजार ४४३ ९.१८%
मार्च २0१७ ७ लाख ११ हजार ३१२ ९.0६%
जून २0१७ ८ लाख २९ हजार ३३८ १0.२१%

डोकेदुखी वाढली : आजवर १२ कोटी ७८ लाख लोकांना, शिशू= ५0 हजारांपर्यंत, किशोर=५ लाखांपर्यंत, व तरुण= ५ ते १0 लाखांपर्यंत अशा ३ स्वतंत्र प्रवर्गात मुद्रा बँकेचे कर्जवाटप झाले. सरकारी दबावाखाली हे कर्जवाटप झाले असल्यास, आगामी काळात हे कर्ज
बँकांची डोकेदुखीच ठरणार आहे.

बँका अतिशय तणावाखाली
एनपीएचा विषय कशा प्रकारे हाताळायचा हा आज देशातल्या पहिल्या १५ बँकांपुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या १५ टॉप बँकांमध्ये
१३ राष्ट्रीयीकृत तर आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस अशा २ खासगी बँका आहेत. तक्त्यानुसार अखेरची तिमाही जून २0१७ मधे सर्वाधिक एनपीए (२२.७ टक्के) स्टेट बँक आॅफ इंडियाचा होता. त्याची एकूण रक्कम १ लाख ८८ हजार 0६८ कोटींची आहे.

भारतातल्या पहिल्या ५ टॉप बँका, स्टेट बँक, पंजाब
नॅशनल, बँक आॅफ इंडिया, आयडीबीआय व बँक आॅफ बरोडाचा एकूण एनपीए ४७.४ टक्के म्हणजे ३ लाख ९३ हजार १५४ कोटींचा आहे. एनपीएच्या संदर्भात देशातल्या १२ टॉप बँकांपैकी ११ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. १२वी खासगी क्षेत्रातली बँक आयसीआयसीआय आहे.

खासगी क्षेत्रातल्या दोन बँका आयसीआयसीआय व अ‍ॅक्सिस बँकांचा संयुक्त एनपीए ७.९ टक्के आहे, तर पहिल्या टॉप १२ बँकांचा एकूण एनपीए ७५.७ टक्के आहे. राष्ट्रीयीकृत बँका आजमितीला अतिशय तणावाखाली आहेत.

Web Title: Nationalized banks with Mudra banks in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.