Join us

नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 12:10 PM

नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. रघुनंदन कामथ यांच्या निधनाची माहिती कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवरून देण्यात आली आहे.

आईस्क्रीम मॅन म्हणून देशात प्रसिद्ध असलेले आणि नॅचरल आइस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन झाले. मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. रघुनंदन कामथ यांच्या निधनाची माहिती कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवरून देण्यात आली आहे. कंपनीने केलेल्या पोस्टमध्ये नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन कामथ यांचे निधन झाल्याचे म्हटले आहे. खरंच हा आमच्यासाठी खूप दुःखाचा आणि दुर्दैवी दिवस आहे, असंही यात म्हटले आहे.

४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

आपल्या सुरुवातीच्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करूनही कामथ यांनी हार मानली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे वडील कर्नाटकात लहान फळ विक्रेते होते. मंगळुरूमधील एका छोट्या गावात फळे विकण्यासाठी रघुनंदन कामथ नियमितपणे वडिलांना मदत करत होते. पुढे शाळेत नापास झाल्यामुळे त्यांना शिक्षण मध्येचे सोडावे लागले. रघुनंदन श्रीनिवास कामथ यांना भारतातील आईस्क्रीम मॅन देखील म्हटले जाते.

रघुनंदन कामथ यांच्या निधनाची माहिती कंपनीच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे. कंपनीने लिहिले आहे की, नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन कामथ यांचे निधन झाले आहे. खरंच हा आमच्यासाठी खूप दुःखाचा आणि दुर्दैवी दिवस आहे. रघुनंदन कामथ यांचा जन्म कर्नाटकातील मंगळुरू येथील एका गावात झाला. ते ६ भावंडांपैकी एक होते. मुंबईत येऊन भावाच्या रेस्टॉरंटमध्ये काम करू लागल्यानंतर काही दिवसांनी ते वेगळे झाले.

रघुनंदन श्रीनिवास कामथ यांनी १४ फेब्रुवारी १९८४ रोजी फक्त चार कर्मचारी आणि १० आइस्क्रीम फ्लेवर्ससह नॅचरल आईस्क्रीमची स्थापना केली. त्यांनी फक्त फळे, दूध आणि साखर वापरून आईस्क्रीम बनवले. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कामथ यांनी मुख्य पदार्थ म्हणून पावभाजी आणि साइड आयटम म्हणून आइस्क्रीम विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला १२ फ्लेवर्स स्टोअरमध्ये उपलब्ध होते. 

टॅग्स :व्यवसाय