अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आंतरराष्टÑीय व्यापाराचे स्वरूप कोरोनाकाळात बदलल्याचा अनुभव महाराष्टÑातील उद्योगांना येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून दक्षिण अमेरिकेसह युरोपीय देशांमधून रासायनिक खते, औषधे, सिलिंग केमिकल यांच्या मागणीत २५ टक्के वाढ झाली आहे.महाराष्टÑातून रासायनिक खते, आॅटोमोबाइल कम्पोनंट, सिलिंग केमिकल, औषधे यांची मोठी निर्यात होत असते. सांगली जिल्ह्यातील उद्योगांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अरब राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर येथून या उत्पादनांची निर्यात होत होती. कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन झाल्यानंतर काहीकाळ उद्योग बंद राहिले. परिणामी निर्यातही ठप्प झाली होती. सांगली जिल्ह्यातून या नव्या देशांशी आता व्यापार सुरू झाला आहे. आंतरराष्टÑीय स्तरावर नवे व्यापारीमित्र महाराष्टÑातील उद्योगांना मिळत आहेत.आॅनलाइन चौकशी करून मालाच्या उपलब्धतेची खात्री आयातदार करीत असून, तातडीने पैसे पाठवून मालाची डिलिव्हरी मागत आहेत. यापूर्वी यातील अनेक देश हे चीनमधून माल खरेदी करीत होते. अचानक यातील अनेक देश आता पर्याय म्हणून भारतातील उद्योगांकडे मालाची मागणी करताना दिसत आहेत. पुढील काळात हे प्रमाण आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्टÑीय बाजारपेठेतील बदलाची यासह अन्य कारणेही असू शकतात. त्याबाबतचा अभ्यासही उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ करीत आहेत. कायमस्वरूपी हे देश जर भारतातील उद्योजकांशी जोडले गेले, तर त्याचा दीर्घकालीन फायदा महारोष्ट्रातील उद्योग क्षेत्राला होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे नवे व्यापारीमित्र येथील उद्योगांनी तयार केले आहेत.अनेक नवीन देशांमधून येऊ लागल्या आॅर्डरसर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निर्यातीची गाडी रुळावर आली, मात्र बाजारपेठेचे स्वरूप बदलत असल्याचा अनुभव उद्योगांना येत आहे. ज्या देशांशी यापूर्वी कधीही व्यवहार केला नाही, अशा देशांमधून मालाला आॅनलाइन मागणी येऊन ते व्यवहारही पूर्णत्वास जात आहेत. ब्राझील, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, माल्टा, साऊथ आफ्रिका याठिकाणांहून महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांमधील उद्योजकांना संपर्क साधून माल मागविला जात आहे.गेल्या दोन महिन्यांत आंतरराष्टÑीय व्यापारात आम्हाला बदल दिसत आहेत. ज्या देशांशी कधीही व्यवहार केला नाही, त्या ठिकाणाहून मालाला मागणी येऊन व्यापार सुरू झाला आहे. एकूण निर्यातीत २५ टक्के निर्यात नव्या व्यापारी देशांमध्ये होत आहे. कायमस्वरूपी हे देश येथील उद्योगांशी जोडले जाण्याची अपेक्षा आहे. याचा महाराष्टÑातील उद्योगांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो.- संजय अराणके अध्यक्ष,सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
उद्योगांसाठी निर्यात बाजारपेठेचे स्वरूप बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 2:40 AM