मुंबई - नवी मुंबई विमानतळाचे टेक-आॅफ डिसेंबर २०१९पर्यंत होणे अवघड असल्याचे स्पष्टीकरण नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव नयन चौबे यांनी दिले आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळावरून डिसेंबर २०१९पर्यंत पहिल्या विमानाचे उड्डाण होईल, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस सातत्याने करतात. चौबे यांनी मात्र हे सोपे नाही. परंतु त्यासाठी पूर्ण जोमाने प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. अमेरिका-भारत ट्रेड डेव्हलपमेंट एजन्सीअंतर्गत हवाई क्षेत्रातील सहकार्यासंबंधीची परिषद गुरुवारी सुरू झाली. त्या वेळी चौबे म्हणाले, स्वस्त दरात विमान प्रवासासाठी ‘उडान’ योजना सुरू झाली आहे. त्या धर्तीवर हवाई माल वाहतूक स्वस्तात होण्यासाठीही विशेष योजना तयार केली जात आहे.
एअर इंडियासाठी अनेक कंपन्या उत्सुक
एअर इंडियाच्या ७६ टक्के खासगीकरणासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत. निविदेतील काही अटी व नियम अलीकडेच बदलले आहेत. त्यानंतर कंपन्या यात रस दाखवत आहेत. निविदेची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. तोपर्यंत आणखी कंपन्या शर्यतीत असतील, असे चौबे यांनी सांगितले. अमेरिकन कंपन्यांनी यात रस दाखवला का, या प्रश्नावर अमेरिका-भारत ट्रेड डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक थॉमस हार्डी यांनी, औपचारिकरीत्या एकाही कंपनीने रस दाखवला नसल्याचे स्पष्ट केले.
नवी मुंबईमधील विमानतळ २०१९ पर्यंत सुरू होणे कठीण
नवी मुंबई विमानतळाचे टेक-आॅफ डिसेंबर २०१९पर्यंत होणे अवघड असल्याचे स्पष्टीकरण नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव नयन चौबे यांनी दिले आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:30 AM2018-05-11T01:30:58+5:302018-05-11T01:30:58+5:30