नवी दिल्ली : आगामी दसरा-दिवाळी पाहून व्यापाऱ्यांनी केलेली जोरदार खरेदी आणि विदेशातून मिळालेले पाठबळ पाहून सोने आज जबरदस्त चमकले. १० ग्रॅममागे ३८५ रुपयांनी वधारून २७ हजारांचा पल्ला ओलांडत २७,१८५ असा दोन आठवड्यांतील उच्चांक गाठला.सोन्याप्रमाणेच चांदीलाही झळाळी आली. औद्योगिक प्रकल्प आणि नाणे उत्पादकांकडून मागणी वाढल्याने चांदी किलोमागे ५०० रुपयांनी वधारत ३७,३०० रुपये प्रतिकिलोवर गेली. सोने मंगळवारी ५० रुपयांनी घसरले होते. मात्र, सोन्याच्या आयातीचा खर्च वाढण्याची शक्यता नसल्याचे दिसताच व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केली. त्यामुळे सोन्याला बुधवारी झळाळी आली. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही प्रकारच्या सोन्याचे भाव अनुक्रमे २७,१८५ रुपये आणि २७,०३५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. यापूर्वी २५ सप्टेंबर रोजी सोन्याने हे भाव गाठले होते. चांदीच्या नाण्याचे भावही एक हजार रुपयांनी वधारले. १०० नाण्यांच्या खरेदीचा दर ५२ हजार रुपये, तर विक्रीचा दर ५३ हजार रुपये होता.
नवरात्राची तेजी; सोन्याने ओलांडला २७ हजारांचा टप्पा
By admin | Published: October 14, 2015 11:13 PM