Lokmat Money > बिझनेस न्यूज > देवाचे आभारी, अंबानी कुटुंबानं वाचवलं...; सिंघानिया यांच्या पत्नीचा आणखी एक दावा

देवाचे आभारी, अंबानी कुटुंबानं वाचवलं...; सिंघानिया यांच्या पत्नीचा आणखी एक दावा

अंबानी कुटुंबाने पोलिसांना मदत केली असं नवाज मोदींनी म्हटलं. नवाज यांच्या या खुलाशावर अंबानी कुटुंबाकडून कुठलेही विधान आले नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 02:04 PM2023-11-22T14:04:09+5:302023-11-22T14:04:46+5:30

अंबानी कुटुंबाने पोलिसांना मदत केली असं नवाज मोदींनी म्हटलं. नवाज यांच्या या खुलाशावर अंबानी कुटुंबाकडून कुठलेही विधान आले नाही. 

Nawaz Modi claims Ambanis Family came to her rescue after ‘assault’ by Gautam Singhania | देवाचे आभारी, अंबानी कुटुंबानं वाचवलं...; सिंघानिया यांच्या पत्नीचा आणखी एक दावा

देवाचे आभारी, अंबानी कुटुंबानं वाचवलं...; सिंघानिया यांच्या पत्नीचा आणखी एक दावा

मुंबई - उद्योगपती गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्यातील घटस्फोट प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. एका मुलाखतीत गौतम सिंघानियाच्या पत्नीने उघडपणे अब्जाधीशावर गंभीर आरोप केले आहे. गौतम सिंघानियांनी मला आणि माझी मुलगी निहारिकाला मारहाण आणि शारिरीक छळ केला.या प्रकारात अंबानी कुटुंबानेही हस्तक्षेप केल्याचा उल्लेख नवाज मोदींनी केला. 

रिपोर्टनुसार, नवाज मोदी १० सप्टेंबरला सकाळी घडलेली घटना सांगतात की, मुंबईच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या पार्टीनंतर सिंघानियाने मला आणि माझ्या मुलीला मारहाण केली. त्यानंतर मी आणि माझी मुलगी निहारिका यांनी पोलीस मदत मागण्याचा प्रयत्न केला. पोलीस आपल्या मदतीला येणार नाहीत असं मला वाटलं. त्यामुळे मी मैत्रिण अनन्या गोयंका यांना फोन केला होता. या प्रकरणात नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी मला वाचवले आणि पोलीस कारवाईत मदत केली असा दावा गौतम सिंघानिया यांच्या पत्नीने केला आहे. 

माझी मुलगी निहारिकाने तिचा मित्र विश्वरुपला बोलावले. जो सिंघानियाचा चुलत भाऊ त्रिशाकर बजाज यांचा मुलगा आहे. निहारिकाने मित्र विश्वरुपला सांगून त्रिशाकर बजाज यांना गौतम सिंघानिया यांच्याशी बोलायलाही सांगितले. देवाचे आभारी आहे, अनंत आणि नीता अंबानीसह संपूर्ण कुटुंब मदतीसाठी पुढे आले. गौतम सिंघानियाने पोलिसांना येण्यापासून रोखले. परंतु अंबानी कुटुंबाने पोलिसांना मदत केली असं नवाज मोदींनी म्हटलं. नवाज यांच्या या खुलाशावर अंबानी कुटुंबाकडून कुठलेही विधान आले नाही. 

जेके हाऊसमध्ये पोलिसांना रोखले
नवाज मोदींनी म्हटलं की, रेमंड ग्रुपचे बॉस गौतम सिंघानिया यांनी जेके हाऊसमध्ये पोलिसांना येण्यापासून रोखले होते. पोलीस कारवाई होऊ नय यासाठी प्रयत्न केले. परंतु अंबानी कुटुंबाच्या मदतीमुळे गौतम सिंघानिया यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र गौतम सिंघानिया यांनी नवाज मोदी यांनी लावलेल्या आरोपावर बोलण्यास नकार दिला. मी २ मुलीच्या हितासाठी कुटुंबाची प्रतिमा जपत आहे. त्यामुळे कुठल्याही विधानावर मी बोलणार नाही असं गौतम सिंघानिया यांनी म्हटलं. 

गौतम सिंघानिया आणि पत्नी नवाज मोदी ३२ वर्षाच्या वैवाहिक आयुष्यानंतर एकमेकांपासून वेगळे होत आहेत. काही दिवसांपूर्वीच नवाज मोदी यांनी ११ हजार कोटी ७५ टक्के हिस्सा मागितला आहे. मोदी यांनी हा हिस्सा दोन मुली निहारिका आणि निसा यांच्यासाठी मागितल्याचे बोलले जाते. 

Web Title: Nawaz Modi claims Ambanis Family came to her rescue after ‘assault’ by Gautam Singhania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.