NBCC Share Price : सरकारी मल्टीबॅगर स्टॉक NBCC मध्ये शुक्रवारी (9 ऑगस्ट) दमदार वाढ झाली. कंपनीला 15,000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली, ज्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला. हा शेअर दिवसभरात जवळपास 9% वाढला आणि 184 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. तर, काल हा शेअर 169 रुपयांवर बंद झाला होता.
NBCC ला मिळाली मोठी ऑर्डर
प्रकल्प व्यवस्थापन आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी NBCC ला श्रीनगरमधील 406 एकर परिसरात पसरलेली सॅटेलाइट टाउनशिप विकसित करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. श्रीनगर विकास प्राधिकरणाकडून हे कंत्राट मिळाल्याची माहिती कंपनीने शुक्रवारी शेअर बाजाराला दिली. याअंतर्गत जम्मू-काश्मीरमधील बेमिना, श्रीनगर येथे 406 एकर जागेवर सॅटेलाइट टाऊनशिप विकसित केली जाईल.
NBCC शेअरचा इतिहास
NBCC च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या 5 दिवसात त्यात 8% वाढ झाली आहे, तर 6 महिन्यांत जवळपास 24% परतावा दिला आहे. या वर्षी 1 जानेवारी ते 9 ऑगस्ट 2024 पर्यंत, या स्टॉकने 123% चा मजबूत परतावा दिला आहे. तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 5 वर्षात 429% आणि शेअर लिस्ट झाल्यापासून 2,801% रिटर्न्स मिळाले आहेत.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)