Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणं आयुष्याचं शतक पार करा, अर्थमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या खोचक शुभेच्छा

पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणं आयुष्याचं शतक पार करा, अर्थमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या खोचक शुभेच्छा

निर्मला सीतारामन यांच्या रूपाने भारताला पहिल्या महिला अर्थमंत्री मिळाल्या. नोटाबंदी, GST सारखे वादग्रस्त निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले होते. त्यामुळे, सीतारामन अर्थमंत्री झाल्यावर मोडलेल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 01:57 PM2021-08-18T13:57:02+5:302021-08-18T13:58:28+5:30

निर्मला सीतारामन यांच्या रूपाने भारताला पहिल्या महिला अर्थमंत्री मिळाल्या. नोटाबंदी, GST सारखे वादग्रस्त निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले होते. त्यामुळे, सीतारामन अर्थमंत्री झाल्यावर मोडलेल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं.

NCP's MLA rohit pawar best wishes to Finance Minister with critis by petrol and diesel rates | पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणं आयुष्याचं शतक पार करा, अर्थमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या खोचक शुभेच्छा

पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणं आयुष्याचं शतक पार करा, अर्थमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या खोचक शुभेच्छा

Highlightsदेशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना!

नवी दिल्ली - देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा आज 62 वा वाढिदवस आहे. देशभरातून दिग्गज नेत्यांनी सितारमण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खोचक शब्दात अर्थमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव किंमतीवर त्यांनी भाष्य केलंय. 

निर्मला सीतारामन यांच्या रूपाने भारताला पहिल्या महिला अर्थमंत्री मिळाल्या. नोटाबंदी, GST सारखे वादग्रस्त निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले होते. त्यामुळे, सीतारामन अर्थमंत्री झाल्यावर मोडलेल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. सीतारामन यांनाआतापर्यंत विरोधकांची बरीच टीका झेलावी लागली आहे. मात्र, आपल्या शांत स्वभावातून आणि कामातूनच त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतरही त्यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे. 


पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडत चाललेले दरही आटोक्यात येणार नाहीत, अशी कटू घोषणा त्यांनी वाढदिवसाच्या एकच दिवस आधी केली. त्यावरुनच, आता सितारमण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही खोचक टोमणा आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. 

काय म्हणाल्या होत्या अर्थमंत्री

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे.देशात इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोलनं अनेक राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी इंधनाचे दरात घट होण्याची शक्यता कमी आहे, असं सांगितलं आहे. उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी स्पष्ट केलं आहे. याला सर्वस्वी काँग्रेसप्रणित युपीए सरकार जबाबरदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

Web Title: NCP's MLA rohit pawar best wishes to Finance Minister with critis by petrol and diesel rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.