Join us

गरज ९० हजार कापूस गाठींची, पुरवठा ५० हजार गाठींचाच!

By admin | Published: April 23, 2015 11:16 PM

देशभरातील शेतकऱ्यांकडून आजमितीस ३ कोटी २६ लाख ९ हजार गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे; पण देशांतर्गत लागणाऱ्या कापसाच्या गाठी व

राजरत्न सिरसाट, अकोलादेशभरातील शेतकऱ्यांकडून आजमितीस ३ कोटी २६ लाख ९ हजार गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे; पण देशांतर्गत लागणाऱ्या कापसाच्या गाठी व पुरवठ्यात तफावत आहे. सध्या देशांतर्गत कापसाची गरज ही प्रतिदिन ९० ते ९२ हजार गाठींची आहे; पुरवठा मात्र ५० हजार गाठींचाच असल्याने खासगी बाजारात कापसाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा सोडला, तर देशात कापसाचे बऱ्यापैकी उत्पादन झाले असून, यावर्षी प्रथमच संपूर्ण देशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) आणि खाजगी व्यापाऱ्यांनी हा कापूस खरेदी केला आहे. यामध्ये सीसीआयचा उपअभिकर्ता राज्यातील महाराष्ट्र कापूूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने राज्यात विविध केंद्रांवर खरेदी केलेल्या कापसाचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक ८१ लाख ८३ हजार गाठी कापसाची खरेदी गुजरातमध्ये झाली आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये ७९ लाख ८९ हजार गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ६५ लाख १५ हजार गाठींची विक्री झाली आहे. मध्यप्रदेशात १६ लाख १७ हजार गाठी, कर्नाटक २७ लाख ३८ हजार गाठी, पंजाब ११ लाख २१ हजार गाठी, हरियाणात १९ लाख ३८ हजार गाठी, राजस्थान १६ लाख ५८ हजार गाठी व इतर मिळून ५ लाख ४६ हजार अशा ३ कोटी २६ लाख ९ हजार कापूस गाठींची खरेदी झाली आहे. सध्या दररोज भारतीय बाजारपेठेत ४० हजार गाठींची आवक सुरू आहे. त्यामुळे येत्या महिन्यात आणखी ४० ते ५० लाख गाठी विक्रीला येण्याची शक्यता कापूस व्यापारी वर्तुळामध्ये वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, एवढा कापूस खरेदी झाला असताना देशांतर्गत उद्योगांना कापसाचा जवळपास ४० ते ५० हजार गाठींचा पुरवठा कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्यांना दररोज जवळपास ९० ते ९२ हजार गाठींची गरज आहे. तथापि, पुुरवठा मात्र ५० हजार गाठींपेक्षा कमी होत आहे.