मुंबई : पर्यावरणासाठी ‘ग्रीन सिटी’ संकल्पना आतापर्यंत वारंवार राबविण्यात आली असून त्याबाबत जनजागृतीही सुरू आहे. यासोबतच आता ‘ब्ल्यू सिटी’ संकल्पना राबविण्याची गरज आहे, असे मत भारतीय ग्रीन बिल्डिंग परिषदेचे धोरण प्रमुख व हुडकोचे माजी एमडी व्ही. सुरेश यांनी व्यक्त केले.
भारतीय उद्योग महासंघातर्फे (सीआयआय) स्मार्ट सिटी परिषद झाली. त्यामध्ये भारतीय शहरांना ‘स्मार्ट’ करण्यासमोरील आव्हाने व उपाययोजना यावर विस्तृत चर्चा झाली. व्ही. सुरेश म्हणाले, शहरातील दूषित पाणी हा स्मार्ट सिटीतील प्रमुख अडथळा आहे. असे लाखो लीटर दूषित पाणी आजही अनेक शहरांमधून वाहणाºया नद्या, नाले आणि तलावांत सोडले जाते. त्यावर उपाय म्हणून ‘ब्ल्यू सिटी’ संकल्पनेद्वारे शहरांमधील सर्व जलसंपत्तीसमोरील भागाचा पर्यावरणाच्या आधारे विकास केला जावा. त्यातून एकूणच शहर सुधारेल. यासोबतच प्रत्येक शहराची विकास नियंत्रण नियमावली अर्थात डीसीआर हे ग्रीन बिल्डिंग संकल्पनेसोबत एकात्मिक असावे.
सीआयआय पश्चिम क्षेत्र स्मार्ट सिटी फोरमचे अध्यक्ष सुनील खन्ना, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासह स्मार्ट सिटीशी संबंधित सुनील नागपाल, प्रसन्ना विभांडीक, श्रीरंग देशपांडे आदी तज्ज्ञ या वेळी उपस्थित होते.
सिटी करणार ग्रीन-
आयजीबीसीच्या पुढाकाराने देशात आतापर्यंत ४.८३ अब्ज चौरस फूट ग्रीन बिल्डिंग बांधकाम झाले आहे.
२०२२पर्यंत त्यात आणखी
१० अब्ज चौरस फुटांची वाढ करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी योजनेला ‘ग्रीन सिटी’ करण्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली जात असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
‘ब्ल्यू सिटी’ची गरज : नद्या, तलावांचे संवर्धन; स्मार्ट सिटी परिषद
पर्यावरणासाठी ‘ग्रीन सिटी’ संकल्पना आतापर्यंत वारंवार राबविण्यात आली असून त्याबाबत जनजागृतीही सुरू आहे. यासोबतच आता ‘ब्ल्यू सिटी’ संकल्पना राबविण्याची गरज आहे, असे मत भारतीय ग्रीन बिल्डिंग परिषदेचे धोरण प्रमुख व हुडकोचे माजी एमडी व्ही. सुरेश यांनी व्यक्त केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:48 AM2017-12-20T00:48:45+5:302017-12-20T00:48:58+5:30