Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘ग्राहकहित जपण्यासाठी ग्राहक चळवळीची गरज’

‘ग्राहकहित जपण्यासाठी ग्राहक चळवळीची गरज’

सध्याचे जग ई-कॉमर्स झाले आहे. आॅनलाईन खरेदी-विक्रीमध्ये आता बलाढ्य कंपन्यांचा समावेश होत आहे. या कं पन्या मोठ्या प्रमाणात उलाढाल करताना दिसतात

By admin | Published: April 20, 2015 11:38 PM2015-04-20T23:38:18+5:302015-04-20T23:38:18+5:30

सध्याचे जग ई-कॉमर्स झाले आहे. आॅनलाईन खरेदी-विक्रीमध्ये आता बलाढ्य कंपन्यांचा समावेश होत आहे. या कं पन्या मोठ्या प्रमाणात उलाढाल करताना दिसतात

Need for Customer Movement to Conserve Customers' | ‘ग्राहकहित जपण्यासाठी ग्राहक चळवळीची गरज’

‘ग्राहकहित जपण्यासाठी ग्राहक चळवळीची गरज’

पुणे : सध्याचे जग ई-कॉमर्स झाले आहे. आॅनलाईन खरेदी-विक्रीमध्ये आता बलाढ्य कंपन्यांचा समावेश होत आहे. या कं पन्या मोठ्या प्रमाणात उलाढाल करताना दिसतात; पण त्याचबरोबर ग्राहकहित जपणेही आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागात आॅनलाईन खरेदी-विक्रीत ८० टक्के वाढ झाली आहे, त्यामुळे ग्राहकहित आणि ग्राहक चळवळ ही काळाची गरज झाली आहे, असे मत राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डी.के . जैन यांनी व्यक्त के ले.
भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे आयोजित ‘कन्झ्युमर लॉ अँड पॉलिसी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. जैन म्हणाले, ग्राहक कायद्यात काही बदलांची गरज आहे. ज्यामध्ये मध्यस्थी कें द्रे वाढविण्याची, ग्राहक मंचासाठी पायाभूत सुविधा, उपयुक्त गरजांची वाढ करण्याची, तसेच प्रलंबित खटले ९० दिवसांत निकाली लावण्याची सोय व्हावी असे काही बदल सुचविले. (प्रतिनिधी)

Web Title: Need for Customer Movement to Conserve Customers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.