Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशाच्या विकासासाठी महागाईचे कंबरडे मोडण्याची गरज

देशाच्या विकासासाठी महागाईचे कंबरडे मोडण्याची गरज

देशाच्या विकासात अडथळा ठरलेल्या महागाईचे कंबरडे मोडण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे

By admin | Published: September 26, 2014 05:18 AM2014-09-26T05:18:29+5:302014-09-26T05:18:29+5:30

देशाच्या विकासात अडथळा ठरलेल्या महागाईचे कंबरडे मोडण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे

The need for inflation to break the country's development | देशाच्या विकासासाठी महागाईचे कंबरडे मोडण्याची गरज

देशाच्या विकासासाठी महागाईचे कंबरडे मोडण्याची गरज

मुंबई : देशाच्या विकासात अडथळा ठरलेल्या महागाईचे कंबरडे मोडण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. असे झाल्यास रिझर्व्ह बँकेचे काम सोपे होईल, असे ते म्हणाले.
८ व्या सांख्यिकी दिवसानिमित्त येथे आयोजित परिषदेत राजन बोलत होते. ते पुढे म्हणाले, अर्थव्यवस्था वाढीत मूळ समस्या महागाईची असून ती सातत्याने वाढत आहे. आम्ही महागाईचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला हा अडथळा संपवण्याची गरज आहे. महागाईवर नियंत्रणानंतर आरबीआयचे काम आणखी सोपे होईल.
आॅगस्टमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक वा किरकोळ महागाई कमी होऊन ७.८ टक्क्यांवर आली. जुलैमध्ये ही ७.९६ टक्क्यांवर होती. तिकडे ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई आॅगस्टमध्ये घटून ३.७४ टक्क्यांवर आली, जुलैमध्ये ती ५.१९ टक्के होती.
राजन म्हणाले की, देशात उपलब्ध असलेली विविध प्रकारची आर्थिक आकडेवारी विस्तृत स्वरूपाची आहे. यात तात्काळ सुधारणा करण्याची गरज आहे.
आकड्यांची गुणवत्ता, त्यांची मात्रा व त्यांची व्याप्ती यात सुधारणा करण्याची आवश्यकता असून यादृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. भारतातील रोजगाराशी संबंधित आकडेवारी खूप उशिरा येते. यावरच विविध देश पतधोरणाशी संबंधित निर्णय घेतात. (प्रतिनिधी)









 

Web Title: The need for inflation to break the country's development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.