Lokmat Money > बिझनेस न्यूज > झटपट पैसे हवेत?; लाेकांची डिजिटल कर्जाला पसंती

झटपट पैसे हवेत?; लाेकांची डिजिटल कर्जाला पसंती

४९ टक्के वाढ, १.४६ लाख कोटींचे वाटप.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 09:29 AM2024-06-22T09:29:41+5:302024-06-22T09:30:23+5:30

४९ टक्के वाढ, १.४६ लाख कोटींचे वाटप.

Need quick money People prefer digital loans | झटपट पैसे हवेत?; लाेकांची डिजिटल कर्जाला पसंती

झटपट पैसे हवेत?; लाेकांची डिजिटल कर्जाला पसंती

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लाेकांना घर बसल्या ऑनलाईन कर्ज घेणे आवडत आहे. वित्त वर्ष २०२३-२०२४ मध्ये डिजिटल कर्जात ४९ टक्के वाढ झाली असून ३७ कंपन्यांनी तब्बल १.४६ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. कर्जाचा सरासरी तिकीट आकार १२,६४८ रुपये राहिला.

‘फिनटेक असोसिएशन फॉर कन्झुमर एम्पावरमेंट’ने (एफएसीई) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, लाेकांचा कल या कर्जाकडे वाढलेला दिसत आहे. वित्त वर्ष २०२३-२०२४ मध्ये वितरित करण्यात आलेल्या डिजिटल कर्जाची संख्या ३५ टक्के वाढली. या वर्षात १० कोटींपेक्षा अधिक कर्जे वितरित करण्यात आली. 

मार्चच्या तिमाहीत ४०,३२२ कोटी रुपयांची २.६९ कोटी कर्जे या कंपन्यांनी दिली.  कर्जाचा सरासरी तिकीट आकार १३,४१८ कोटी 
रुपये राहिला. 

७० टक्के कर्जे २८ कंपन्यांनी वितरित केली आहेत. या कंपन्या बिगर - बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) म्हणून नोंदणीकृत आहेत.

आरबीआयची चिंता : डिजिटल कर्जाच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रमाणावर आरबीआयने देखिल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात आरबीआयने नव्या मार्गदर्शक सुचनांचा एक मसुदादेखील बनविला आहे.

Web Title: Need quick money People prefer digital loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.