Join us

दोन दशकांमध्ये १९ कोटी बेरोजगारांना नोकऱ्या, दरवर्षाला १ कोटी नवे रोजगार निर्माण करण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 6:10 AM

Employment News: मागील दोन दशकांमध्ये भारतात तब्बल १९.६ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यातील दोन तृतीयांश पदे मागच्या दशकात निर्माण झाली आहेत. या काळात शेती आणि शेतीसंबंधीत उद्योगांशी संबंधित असलेले मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्राकडे वळले असल्याचे दिसून आले आहे.

 नवी दिल्ली - मागील दोन दशकांमध्ये भारतात तब्बल १९.६ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यातील दोन तृतीयांश पदे मागच्या दशकात निर्माण झाली आहेत. या काळात शेती आणि शेतीसंबंधीत उद्योगांशी संबंधित असलेले मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्राकडे वळले असल्याचे दिसून आले आहे, असे निरीक्षण ‘गोल्डमन सॅक्स’ या रेटिंग एजन्सीच्या ताज्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

भारताला दरवर्षी ६.५ टक्के इतक्या जीव्हीएनुसार (सकल मूल्यवर्धित) वाढ गाठायची असेल तर २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून २०२९-३० पर्यंत दरवर्षी सुमारे १ कोटी इतक्या रोजगारांची निर्मिती करावी लागेल.  यासाठी उपलब्ध मनुष्यबळाकडे असलेल्या कौशल्यसंचानुसार उद्योगांना चालना द्यावी लागेल, असेही या अहवालात म्हटले आहे. 

सर्वाधिक संधी कुठे?- भारतात उत्पादन क्षेत्राने प्रामुख्याने रोजगारांच्या निर्मितीला गती दिली आहे. एकूण नोकऱ्यांपैकी १३ टक्के संधी या क्षेत्राने दिल्या आहेत.- बांधकाम क्षेत्र तसेच पायाभूत प्रकल्पांनी मागील दोन दशकात नोकरीच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. 

नोकऱ्या कुठून येणार?पुढील पाच वर्षात देशात परवडणारी घरे बांधण्यावर बांधकाम क्षेत्राने भर द्यायला हवा. कारण ८० टक्के पेक्षा अधिक मजूरांच्या हाताला काम क्षमता या उद्योगात आहे, असेही यात म्हटले आहे.विविध कौशल्यसंचानुसार संबंधित उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देण्याची गरज आहे. टिअर २ आणि टिअर ३ शहरांमध्ये आयटी हब आणि छोट्या शहरांमध्ये ग्लोबर कॅपेबिलिटी सेंटर्स सुरु केल्याने टिअर १ मधील शहरांवरील तणाव कमी होऊन रोजगार वाढण्यासाठी हातभार लागू शकतो, असे यात म्हटले आहे.कपडे, अन्नप्रक्रिया, फर्निचर आदी श्रमाधारित क्षेत्रांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्यास मजूरांच्या हाताला काम मिळू शकते.

 

टॅग्स :कर्मचारीनोकरीबेरोजगारी