नवी दिल्ली : विदेशात पैसे पाठविण्यासाठी लागणारा वेळ व खर्च कमी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी केले.
‘सेंट्रल बँकिंग ॲट क्रॉसरोड्स’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत शक्तिकांत दास यांनी सांगितले की, भारतासह अनेक उगवत्या आणि विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी सीमा पार पीयर-टू-पीयर (पी २ पी) पेमेंट शक्यता तपासण्यासाठी पैसे हस्तांतरण हे सर्वात पहिले पाऊल आहे. पैसे पाठविण्याचा सध्या होणारा खर्च आणि वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मोठा वाव आहे.
डॉलर युरो आणि पाउंड यासारख्या प्रमुख व्यापारी चलनातील ‘वास्तवकालीन सकळ निपटारा’च्या (आरटीजीएस) विस्ताराची व्यवहार्यता द्विपक्षीय अथवा बहुपक्षीय व्यवस्थेच्या माध्यमातून तपासली जाऊ शकते.