Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीतील व्याख्या समजून घेणे गरजेचे!

जीएसटीतील व्याख्या समजून घेणे गरजेचे!

काल आपण ज्या व्याख्या वाचल्या, त्या शिवायही बऱ्याच अशा व्याख्या येणार आहेत, ज्याची उकल केल्यास, येणारा ‘वस्तू व सेवांवरील कर

By admin | Published: January 23, 2017 01:20 AM2017-01-23T01:20:26+5:302017-01-23T01:20:26+5:30

काल आपण ज्या व्याख्या वाचल्या, त्या शिवायही बऱ्याच अशा व्याख्या येणार आहेत, ज्याची उकल केल्यास, येणारा ‘वस्तू व सेवांवरील कर

Need to understand GST definitions! | जीएसटीतील व्याख्या समजून घेणे गरजेचे!

जीएसटीतील व्याख्या समजून घेणे गरजेचे!

काल आपण ज्या व्याख्या वाचल्या, त्या शिवायही बऱ्याच अशा व्याख्या येणार आहेत, ज्याची उकल केल्यास, येणारा ‘वस्तू व सेवांवरील कर’ कायदा समजणे अवघड जाणार नाही, म्हणूनच निर्यात सेवा(Export of Service)  अशांचा पुरवठा ज्यात
अ) सेवा पुरवठादार भारतात असेल.
ब) सेवा घेणारा भारताबाहेर अस्तित्वात असेल.
क) सेवा पुरवठा करण्याचे ठिकाण भारताबाहेर असेल.
ड) जी सेवा सेवापुरवठादाराने दिली आहे, त्या सेवेचा मोबदला रूपांतरित विदेशी चलनामध्ये मिळाला असेल
इ) सेवापुरवठादार आणि सेवा घेणारा फक्त कागदोपत्रीच वेगळ्या व्यक्ती नसतील. थोडक्यात, एखाद्या व्यक्तीचा भारतातील व्यवसाय आणि त्याचाच दुसऱ्या कुठल्या नावाने भारताबाहेरील व्यवसाय याला कागदोपत्री वेगळ्या व्यक्ती म्हणून गणले/धरले जाते. त्यामुळे परस्पर सेवेला (भारतातून परदेशात दिलेल्या) निर्यात सेवा म्हणता येणार नाही.
जॉब वर्क ((Job Work)) जी व्यक्ती दुसऱ्या कुठल्याही करपात्र व्यक्तीच्या मालकीच्या वस्तूवर काही प्रक्रिया किंवा मांडणी करते, त्या प्रक्रिया अथवा मांडणीला जॉब वर्क असे म्हणतात आणि प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीला जॉबवर्कर असे म्हणतात.
अनिवासी करपात्र व्यक्ती (Non - Resident Taxable Person) व्यवसायासाठी भारतात कायमस्वरूपी ठिकाण नसणारी करपात्र व्यक्ती जी वस्तू किंवा सेवांचे व्यवहार मूळ मालक किंवा दलाल वा अन्य काही म्हणून कधीतरीच करते.
मूळ मालक जिच्या वस्तू किंवा सेवेच्या पुरवठ्याचा व्यवसाय एखाद्या दलालाकडून चालविला जातो. वस्तू किंवा सेवेच्या पुरवठ्याचा व्यवसाय दलालामार्फत करणारी व्यक्ती.
खरेदीदार-पुरवठा घेणारा (Recipient) : वस्तू किंवा वस्तूंच्या सेवेचा पुरवठा घेणारा म्हणजे-
अ) अशी व्यक्ती जी वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्याचा मोबदला देण्यासाठी भाग असते. ब) ज्या वस्तूंचा पुरवठा विनामोबदला असतो, अशा वेळी त्या वस्तू ज्या व्यक्तीला दिल्या जातात किंवा देण्याची व्यवस्था केली जाते किंवा ज्याला त्या वस्तूंचा ताबा दिला जातो किंवा ज्याला त्या वस्तू वापरायला दिल्या जातात किंवा वापरण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात, अशा व्यक्ती. क) विनामोबदला सेवा पुरवठ्याच्या वेळी ज्या व्यक्तीला ती सेवा दिली जाते, ती व्यक्ती आणि ‘घेणारा’ यामध्ये वस्तू किंवा सेवा यांचा स्वीकार घेणाऱ्याच्या वतीने एखाद्या दलालाने घेतला, तरी तो दलाल यात धरला जातो.
संबंधित व्यक्ती (Realated Person) : व्यक्तींना संबंधित व्यक्ती असे म्हटले जाते जेव्हा -
अ) ते एकमेकांच्या व्यवसायामध्ये संचालक किंवा अधिकार व्यक्ती म्हणून काम करत असतील. ब) ते व्यवसायामध्ये कायदेशीर ग्राह्य भागीदार असतील. क) ते मालक आणि नोकर असतील. ड) एखादी व्यक्ती प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे ५% किंवा त्यापेक्षा जास्त टक्क््यांची एकमेकांच्या व्यवसायामध्ये भागधारक किंवा शेअर्स मालकी नियंत्रण असते. इ) दोघांवरही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तिसऱ्या व्यक्तीकडून नियंत्रण ठेवले जात असते. ई) दोघे मिळून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तिसऱ्या कुठल्याही व्यक्तीवर नियंत्रण ठेवत असते. फ) त्या व्यक्ती एकाच कुटुंबातील असतील.यामध्ये ‘व्यक्ती’ म्हणजे कायदेशीर व्यक्ती, तसेच एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या व्यवसायात वा परस्परांमध्ये संबंधित असते किंवा अन्य कुठल्याही मार्गे संलग्न असणाऱ्यांना संबंधित व्यक्ती म्हणूनच संबोधले जाते.
उलट करभरणा ((Reverse Charge) : वस्तू-सेवांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींच्या वतीने वस्तू किंवा सेवांचा पुरवठा घेणारे म्हणून कर भरावयास जबाबदार असणाऱ्या व्यक्ती कोण, हे नंतर स्पष्ट होईल.
सेवा (Service) : म्हणजे ज्या ‘वस्तू’ नाहीत आणि ज्यांना ‘सेवा’ हा दर्जा दिला जाईल, अशांचा समावेश होतो, पण चलन अथवा पैसा यांचा समावेश मात्र होत नाही.
करपात्र पुरवठा : वस्तू किंवा सेवा यांच्या ज्या पुरवठ्यावर कायद्याच्या दृष्टिकोनातून कर भरावा लागतो, तो सर्व पुरवठा म्हणजे करपात्र पुरवठा म्हणता येईल.
(गेल्या दोन लेखांत समाविष्ट केलेल्या १५ व्याख्या या प्रातिनिधिक आहेत.) va3gst@gmail.com - अॅड. विद्याधर आपटे
 

Web Title: Need to understand GST definitions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.