मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे भांडवलीकरण हे सध्या कमकुवत असून सरकारने मदत केल्यासच दिलासा मिळू शकेल. या बँकांना सरकारच्या आर्थिक मदतीच्या इंजेक्शनची गरज असल्याचा अहवाल मुडीजने आज प्रसिद्ध केला.
मुडीजचा गुंतवणुक सेवेवरील वार्षिक बँकिंग प्रणालीवरील अहवाल आज प्रसिद्ध झाला.
बँकांमध्ये मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला गेला आहे. यामुळे बॅंकांचे तरलता प्रमाण 100% पेक्षा अधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसमोर निधी आणि तरलता यांच्याद्वारे आव्हाने असूनही परिस्थिती लवचिक राहील, असेही मुडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे.