कार्लोट्सविले (अमेरिका) : भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडविण्यासाठी व्यवसायात येणारी ओढाताण कमी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी केले. सरकारला आपल्या उद्योगपतींवर पूर्ण विश्वास असेल, असे वातावरण देशात निर्माण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
मूर्ती यांनी सांगितले की, आम्हाला व्यवसायातील ओढाताण दूर करण्यासाठी आणखी काही पावले उचलण्याची गरज आहे. असे वातावरण तयार करण्याची गरज आहे, ज्यामध्ये सरकार आजच्या तुलनेत आपल्या उद्यमी समुदायावर अधिक विश्वास ठेवील. अधिकाधिक जोखीम पत्करण्यास तयार असतील, अशा उद्यमी तरुणांची देशाला गरज आहे. आम्हाला जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अधिकाधिक एकीकरण करण्याची गरज आहे. असे केले तरच आम्ही संपूर्ण जगाला आपला बाजार समजू शकू आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकू. (वृत्तसंस्था)
युवा पिढीने जोखीम पत्करावी
७0 वर्षीय मूर्ती यांचे व्हर्जिनिया विद्यापीठाच्या प्रतिष्ठित डार्दन स्कूल आॅफ बिझनेसच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण झाले. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेत बदल घडविण्यासाठी युवा पिढीने अधिक जोखीम पत्करण्याची तयारी ठेवायला हवी, तसेच जागतिक अर्थव्यवस्थेशी जास्तीतजास्त जुळवून घ्यायला हवे.
ओढाताण कमी करण्याची गरज
भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडविण्यासाठी व्यवसायात येणारी ओढाताण कमी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी केले.
By admin | Published: April 14, 2017 05:16 AM2017-04-14T05:16:41+5:302017-04-14T05:16:41+5:30