Join us

नीरव मोदीकडे सहा पासपोर्ट सध्या मुक्काम बेल्जियममध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:45 AM

पंजाब नॅशनल बँकेस १४ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशातून पसार झालेला आगाडीचा हिरे व्यापारी निरव मोदी याच्याकडे किमान सहा पासपोर्ट असावेत अशी माहिती तपासी यंत्रणांना लागली

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेस १४ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशातून पसार झालेला आगाडीचा हिरे व्यापारी निरव मोदी याच्याकडे किमान सहा पासपोर्ट असावेत अशी माहिती तपासी यंत्रणांना लागली असून, मोदीचा मुक्काम सध्या बेल्जियममध्ये असल्याचा सुगावा भारतीय गुप्तहेर यंत्रणांना लागला आहे.निरव मोदीचा भारतीय पासपोर्ट फेब्रुवारीत रद्द केल्यानंतरही त्याने अनेक देशांच्या वाऱ्या केल्या. यावरून त्याच्याकडे एक निक्रिय व एक सक्रिय अशा दोन भारतीय पासपोर्टसह एकूण सहा पासपोर्ट असावेत, असा तपासी यंत्रणांचा अंदाज आहे. एकाहून जास्त पासपोर्ट जवळ बाळगणे व रद्द केलेल्या पासपोर्टचा वापर करणे हा गुन्हा असून, त्या संदर्भात मोदीवर नवी केस दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.सूत्रांनुसार मोदीकडील सहापैकी दोन पासपोर्ट बराच काळ सक्रिय होते. त्यापैकी एकावर मोदीचे पूर्ण नाव होते, तर दुसºयावर फक्त त्याची अद्याक्षरे होती. या दुसºया पासपोर्टवर त्याने ब्रिटनचा ४० दिवसांचा व्हिसा मिळविला होता. मूळ पासपोर्टसह हा दुसरा पासपोर्टही नंतर रद्द करण्यात आला होता. मोदीने प्रवासासाठी इतर देशांचे पासपोर्ट वापरले का, याचाही तपास करण्यात येत आहे.‘सीबीआय’ने गेल्या आठवड्यात निरव मोदीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस काढण्याची विनंती ‘इंटरपोल’ला केली. त्यासोबत दोन्ही पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश जोडले आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले. अशी ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी झाली व मोदी नेमका कुठे आहे, याची खातरजमा झाली की, त्याच्या प्रत्यार्पणासाठी पावले उचलली जातील, असेही सूत्रांनी सांगितले.मोदी ब्रिटनमध्ये आहे, यास तेथील एका मंत्र्याने गेल्या आठवड्यात दुजोरा दिला होता व भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी अर्ज केल्यास त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.सूत्रांनी सांगितले की, मोदीच्यारद्द केलेल्या दोन्ही पासपोर्टचीमाहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून ‘इंटरपोल’ला दिली गेली होती, परंतु या माहितीचा वापर करून जगात सर्वच ठिकाणी अशा व्यक्तीस अटकाव केला जाऊ शकेल, अशी खात्रीशीर समन्वित यंत्रणानसल्याने मोदी देशोदेशी फिरू शकला असावा, असा तपासी यंत्रणांचाकयास आहे.>ईडी करणार अर्जसमन्स काढूनही निरव मोदीहजर न झाल्याने, त्याला ‘फरार’ घोषित करून त्याच्या वत्याच्या कुटुंबीयांच्या ८.००० कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मुंबईतील विशेष न्यायालयात लवकरच अर्ज करेल, असेही सूत्रांनी सांगितले.40 दिवसांचा ब्रिटनचा व्हिसा त्याने दुसºया पासपोर्टवर मिळविला.

टॅग्स :नीरव मोदी