Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंटरपोलमुळेच नीरव मोदी मोकाट

इंटरपोलमुळेच नीरव मोदी मोकाट

पासपोर्ट रद्द केल्यानंतरही चार देशांमध्ये भ्रमंती करणाऱ्या नीरव मोदीच्या प्रकरणावरुन सीबीआय-इंटरपोल यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:39 AM2018-06-20T00:39:09+5:302018-06-20T00:39:09+5:30

पासपोर्ट रद्द केल्यानंतरही चार देशांमध्ये भ्रमंती करणाऱ्या नीरव मोदीच्या प्रकरणावरुन सीबीआय-इंटरपोल यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

Neerav Modi Mokat due to Interpol | इंटरपोलमुळेच नीरव मोदी मोकाट

इंटरपोलमुळेच नीरव मोदी मोकाट

नवी दिल्ली : पासपोर्ट रद्द केल्यानंतरही चार देशांमध्ये भ्रमंती करणाऱ्या नीरव मोदीच्या प्रकरणावरुन सीबीआय-इंटरपोल यांच्यात वाद निर्माण झाला आहे. इंटरपोलने जाणूनबुजून दूर्लक्ष केल्यानेच नीरव मोदी बिनधास्त परदेशवा-या करू शकला, असा आरोप सीबीआयने केला आहे.
इंटरपोल ही जागतिक पोलिसांची तपास संस्था आहे. सीबीआय या संस्थेची भारतातील प्रतिनिधी आहे. नीरव मोदी १३००० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन विदेशात पळून गेल्यानंतर त्याला आहे तिथून हलता येऊ नये यासाठी सीबीआयच्या विनंतीनुसार परराष्टÑ व्यवहार मंत्रालयाने २४ फेब्रुवारीला त्याचा पासपोर्ट रद्द केला. पण त्यानंतरही मोदीने मार्च ते मेदरम्यान हाँगकाँग, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांचा विमानप्रवास केला.
त्यानंतर त्याने अगदी अलीकडे, म्हणजे १२ जून रोजी लंडन ते बु्रसेल्स (बेल्जियम) असा रेल्वे प्रवास केल्याचे
समोर आले आहे. केवळ इंटरपोलमुळेच मोदी रद्द झालेला पासपोर्टचा वापर करीत असल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
नीरव मोदी कोणकोणत्या देशांमध्ये प्रवास करू शकतो, यासंबंधी सीबीआयने इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, बेल्जियम, फ्रान्स व यूएई या देशांमधील इंटरपोलला कळवले होते. या देशांना इंग्लंडमधील मॅन्चेस्टरच्या इंटरपोल कार्यालयाद्वारे मूळ नोटिशीखेरीज २५ एप्रिल, २२ मे, २४ मे व २८ मे रोजी पुन्हा कळविण्यात आले होते. पण यापैकी केवळ इंग्लंडच्या इंटरपोलने नीरव मोदीने यादरम्यान भारतीय पासपोर्टचा उपयोग करुन कोणकोणत्या देशांत प्रवास केला, याची माहिती दिली, असे सीबीआयने सांगितले.
>१९२ देशांना दिली जाते नोटीस
इंटरपोलचे जगभरात १९२ सदस्य आहेत. रद्द पासपोर्टची माहिती या सर्व सदस्य देशांना ‘प्रसार’ नोटीशीच्या माध्यमातून दिली जाते. ती इंटरपोलच्या डेटा बेसद्वारे एकाचवेळी सर्वत्र जाते. तसे असतानाही इंटरपोलने वेळीच नीरव मोदीला का रोखले नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. इंटरपोलने याआधी डॉ. झाकीर नाईक, ललीत मोदी व विजय मल्ल्या या तिघांबाबतही असेच दुर्लक्ष केले होते. भारतीय नोटिसीकडे इंटरपोल जाणूनबुजून लक्ष देत नाही, की सीबीआयनेच स्वत:चे अपयश झाकण्यासाठी केलेला हा कांगावा आहे, याबाबत संभ्रम आहे.

Web Title: Neerav Modi Mokat due to Interpol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.