Join us

नीरव मोदीचे ‘बडे’ ग्राहकही रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 4:25 AM

पंजाब नॅशनल बँकेस १५ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशातीव परागंदा झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या विविध फर्म्सकडून गेल्या चार वर्षांत मोठ्या किंमतीच्या रत्नाभूषणांची खरेदी केलेल्या ५० हून अधिक बड्या ग्राहकांच्या प्राप्तिकर रिटर्नसची फेरतपासणी करण्याचे प्राप्तिकर विभागाने ठरविले आहे.

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेस १५ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशातीव परागंदा झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या विविध फर्म्सकडून गेल्या चार वर्षांत मोठ्या किंमतीच्या रत्नाभूषणांची खरेदी केलेल्या ५० हून अधिक बड्या ग्राहकांच्या प्राप्तिकर रिटर्नसची फेरतपासणी करण्याचे प्राप्तिकर विभागाने ठरविले आहे.या ग्राहकांनी रत्नाभूषणांच्या खरेदी किंमतीपैकी काही रक्कम रोखीने देऊन व रिटर्न भरताना ते उत्पन्न न दाखवून कर बुडविला असा संशय आहे. या ग्राहकांच्या वर्र्ष २०१४-१५ पासूनच्या प्राप्तिकर रिटर्नसची फेरतपासणी होणार आहे. तपासात घोटाळा उघड झाल्यानंतर या ग्राहकांनी मोदीकडून मोठ्या किंमतीच्या दागिन्यांची खरेदी केल्याचे दिसले. संबंधित वर्षांचे त्यांचे प्राप्तिकर रिटर्न तपासले असता, उत्पन्न व या खरेदीचा मेळ बसत नव्हता.याआधीही या ग्राहकांना मोठ्या खरेदीसाठी उत्पन्नाचा स्रोत कोणता हे विचारले होते. त्यावर त्यांनी खरेदीसाठी चेक वा कार्डासोबत रोकड दिल्याचा इन्कार केला. परंतु नीरवच्या फर्म्सच्या विक्री व्यवहारांच्या नोंदीत खरेदी केलेल्या रत्नाभूषणांची किंमत या ग्राहकांनी सादर केलेल्या चेक किंवा कार्ड व्यवहारातील आकड्यांहून जास्त होती. त्यामुळे या ग्राहकांनी चेक किंवा कार्डाखेरीज दिलेली रोख रक्कम कुठून आली याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या प्राप्तिकर रिटर्नसची फेरतपासणी करण्यात येत आहे.>हरयाणात प्राप्तिकर विभागाची धाड‘स्वराज इंडिया’चे संस्थापक योगेंद्र यादव यांच्या विवाहित बहिणीच्या कुटुंबाच्या मालकीच्या हरयाणातील रेवाडी येथील इस्पितळ समूहावर काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाने घातलेली धाडही नीरव मोदीशी संबंधित अशा संशयास्पद व्यवहारांवरून घातली गेली होती, असेही सूत्रांनी सांगितले. यादव यांनी ही धाड राजकीय सुडापोटी घातल्याचा आरोप केला होता.

टॅग्स :नीरव मोदी