- प्रसाद गो. जोशीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या घोषणावर आनंदाने उसळलेला बाजार पॅकेजची माहिती जाहीर झाल्यावर मात्र निराश झाला आणि त्याने घसरणीच्या माध्यमातून आपली नाराजी दर्शविली आहे. या जोडीलाच अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापारयुद्धाची वाढती शक्यता, अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबत फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांचे मत यामुळेही बाजारात निराशा होतीच.पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधील विविध क्षेत्रांच्या सवलती अर्थमंत्री सीतारामन यांनी जाहीर केल्या. मात्र या सवलती पुरेशा नसल्याचे मत बाजाराचे झाले. परिणामी त्यानंतर बाजार खाली आला. विशेष म्हणजे एमएसएमईला दिलेल्या सवलतींमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अल्पशी वाढ दिसून आली. अमेरिकन अर्थव्यवस्थेची वाढ कमी असल्याने जगाला चिंता लागून आहे.- देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा राईट्स इश्यू येत्या २० तारखेला खुला होत असून, तो ३ जूनपर्यंत खुला राहणार आहे. तीन दशकांमधील रिलायन्सचा हा पहिलाच राईट्स इश्यू आहे. याद्वारे कंपनी ५३,१२५ कोटी रुपये उभारणार आहे.- कंपनीच्या संचालक मंडळाने या इश्यूच्या तारखांना मंजुरी दिली आहे. १४ मे रोजी १५ समभाग धारण करणाऱ्यांना प्रत्येकी १ समभाग या प्रमाणात या राईट्स इश्यूमध्ये शेअर्स मिळणार आहे. या शेअर्ससाठी १२५७ रुपयांचे मूल्य आकारले जाणार आहे. अर्जासोबत २५ टक्के रक्कम भरावयाची असून, उर्वरित रक्कम हप्त्यामध्ये घेतली जाणार आहे.
अर्थमंत्र्यांच्या पॅकेजवर बाजाराचा नकारात्मक सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 11:08 PM