Lokmat Money > बिझनेस न्यूज > ना गुगलचा, ना अॅपलचा, ना अॅमेझॉनचा; हे आहेत सर्वाधिक पगार घेणारे CEO

ना गुगलचा, ना अॅपलचा, ना अॅमेझॉनचा; हे आहेत सर्वाधिक पगार घेणारे CEO

अमेरिकास्थित एका संस्थेच्या 'Equilar 200 Highest-Paid CEO Rankings अनुसार ही नावे जाहीर करण्यात आली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 02:44 PM2018-09-25T14:44:46+5:302018-09-25T14:55:42+5:30

अमेरिकास्थित एका संस्थेच्या 'Equilar 200 Highest-Paid CEO Rankings अनुसार ही नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Neither google, nor apple nor amazon; These are the highest paid CEO's of tech industries | ना गुगलचा, ना अॅपलचा, ना अॅमेझॉनचा; हे आहेत सर्वाधिक पगार घेणारे CEO

ना गुगलचा, ना अॅपलचा, ना अॅमेझॉनचा; हे आहेत सर्वाधिक पगार घेणारे CEO

नवी दिल्ली - कामगार असो किंवा कंपनीचा मॅनेजर प्रत्येकाला पगारवाढ हवी असते. प्रत्येकजण आपणास जास्तीचा पगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येक कंपनीमध्ये सीईओचा रोल महत्त्वाचा असता. त्यामुळेच कंपनींमध्ये सीईओंना पगारही भरगोस मिळतो. आज, आपण सर्वाधिक पगार घेणाऱ्या जगातील टॉप 10 सीईओंची नावे जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे या यादीत जगातील टॉप असलेल्या गुगल, अॅपल आणि अॅमेझॉन कंपनींच्या सीईओंचीही नावे नाहीत. 

अमेरिकास्थित एका संस्थेच्या 'Equilar 200 Highest-Paid CEO Rankings अनुसार ही नावे जाहीर करण्यात आली आहेत. दरवर्षी जगातील 200 सीईओंची यादी जाहीर करण्यात येते. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या सीईओंच्या वार्षिक पगारावरुन ही आकडेवारी ठरविण्यात आली आहे. त्यामध्ये, कमीत कमी 1 मिलियन डॉलर वार्षिक पगार असणाऱ्या सीईओंना स्थान देण्यात आले असून 30 एप्रिल 2018 पर्यंतचा कालावधी यासाठी घेण्यात आला आहे.

1. हॉक ई टान - सीईओ, ब्रॉडकॉम (AVGO)
वार्षिक पगार - 103.2 मिलियन्स डॉलर 

2. डेक्स्टर गोइई - सीईओ, अल्टीस युएसए (ATUS)
वार्षिक पगार -  53.6 मिलियन्स डॉलर

3. स्टेफन कौफर - सीईओ, ट्रीपटवायजर (Trip)
वार्षिक पगार - 43.2 मिलियन्स डॉलर

4. जॉन डोनाहोई - सीईओ, सर्व्हीसनाऊ (Now)
वार्षिक पगार - 41.5 मिलियन्स डॉलर

5. मार्क व्ही हर्ड - सीईओ ओरॅकल (ORCL)
वार्षिक पगार - 40.8 मिलियन्स डॉलर

6. साफ्रा ए कॅट्झ - सीईओ, ओरॅकल (ORCL)
वार्षिक पगार - 40.7 मिलियन्स डॉलर

7. गॅरी ए नॉरक्रॉस - सीईओ, फिडलिटी नॅशनल इन्फोरमेशन
वार्षिक पगार - 28.7 मिलियन्स

8. रोबर्ट कोटीक - सीईओ, अॅक्टीव्हीसन (ATVI)
वार्षिक पगार - 28.7 मिलियन्स डॉलर

9. रँडल एल. स्टीफनसन्स - सीईओ, एटी अँड टी (T)
वार्षिक पगार - 25.3 मिलियन्स डॉलर 

10. जॉन जे लिगरे - सीईओ, टी मोबाईल युएस (TMUS)
वार्षिक पगार - 23.6 मिलियन्स डॉलर 

* 1 डॉलर - 72.87 रुपये
* 1 मिलियन डॉलर - 7,28,65,000 रुपये

Web Title: Neither google, nor apple nor amazon; These are the highest paid CEO's of tech industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.