- प्रसाद गो. जोशी
जगभरामध्ये कोरोना विषाणूचा होत असलेला वाढता प्रसार, त्यामुळे लॉकडाउनच्या कालावधीमध्ये होऊ घातलेली वाढ, मागणी घटल्यामुळे खनिज तेलाच्या दरामध्ये झालेली अभूतपूर्व घट, विविध अहवालांमधून जाहीर होत असलेले अर्थव्यवस्थेच्या संकोचाचे अंदाज अशा निराशाजनक पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओ आणि फेसबुक यांच्यातील गुंतवणुकीच्या कराराची सकारात्मक बातमी फारसा प्रभाव दाखवू शकली नाही. परिणामी दोन आठवड्यांपासून बाजारात होत असलेल्या वाढीला ब्रेक लागला आहे.
रिलायन्स जिओ आणि फेसबुकच्या कराराचे बाजाराने वाढीने स्वागत केले असले तरी ही वाढ अल्पकालीन ठरली. बाजाराबाबत गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होण्याची गरज आहे. खाली आलेला बाजार म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक चांगली संधी आहे. तिचा लाभ घ्यायलाच हवा.
गतसप्ताहामध्ये जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांना फटका बसल्याचे दिसून येत आहे. मात्र निफ्टी मेटल, रिअॅल्टी आणि बॅँक या निर्देशांकांमध्ये तीव्र स्वरुपाची घसरण बघायवास मिळाली, मात्र निफ्टी फार्मा हा निर्देशांक वाढलेला दिसून आला. बीएसई स्मॉलकॅप पेक्षा मिडकॅप निर्देशांकाला जास्तच तोटा सहन करावा लागला. अनेक समभाग चांगल्या किमतीत उपलब्ध असले तरी त्यांच्या खरेदीसाठी कोणी पुढे येत नाही.
परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहामध्ये ४००९.०८ कोटी रुपयांची विक्री केली. त्याचप्रमाणे देशांतर्गत वित्तीय संस्थांनी ६४९.२२ कोटी रुपयांचे समभाग विकले. गतसप्ताहातही या संस्थांनी विक्री केली होती.
घबराटीमुळे वाढीला ब्रेक; निर्देशांकांमध्ये घसरण
. परिणामी दोन आठवड्यांपासून बाजारात होत असलेल्या वाढीला ब्रेक लागला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:37 AM2020-04-27T03:37:53+5:302020-04-27T03:38:00+5:30