Lokmat Money > बिझनेस न्यूज > गेमिंग इंडस्ट्रित प्रवेशासाठी Netflix तयार! लवकरच होऊ शकते घोषणा; असा आहे संपूर्ण प्लॅन

गेमिंग इंडस्ट्रित प्रवेशासाठी Netflix तयार! लवकरच होऊ शकते घोषणा; असा आहे संपूर्ण प्लॅन

गेमिंग शिवाय, Netflix आपल्या व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिसमध्ये आणखी एक नवा प्लॅन जोडणार असल्याचेही समजते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 01:37 PM2021-05-24T13:37:42+5:302021-05-24T13:40:01+5:30

गेमिंग शिवाय, Netflix आपल्या व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिसमध्ये आणखी एक नवा प्लॅन जोडणार असल्याचेही समजते.

Netflix could enter video gaming industry soon all you need to know | गेमिंग इंडस्ट्रित प्रवेशासाठी Netflix तयार! लवकरच होऊ शकते घोषणा; असा आहे संपूर्ण प्लॅन

गेमिंग इंडस्ट्रित प्रवेशासाठी Netflix तयार! लवकरच होऊ शकते घोषणा; असा आहे संपूर्ण प्लॅन

Highlightsव्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स लवकरच व्हिडिओ गेमिंग मार्केटमध्येही प्रवेश करणार आहे.नेटफ्लिक्सच्या गेमिंगमध्ये जाहिरात नसेल. तर ही एक सब्सक्रिप्शनवर आधारित गेमिंग सर्व्हिस असेल.गेमिंग शिवाय, Netflix आपल्या व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिसमध्ये आणखी एक नवा प्लॅन जोडणार असल्याचेही समजते.

नवी दिल्ली - व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) लवकरच व्हिडिओ गेमिंग मार्केटमध्येही प्रवेश करणार आहे. माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, व्हिडिओ स्ट्रिमिंगशिवाय व्हिडिओ गेमिंगमध्येही नशीब आजमावण्याची Netflix ची इच्छा आहे. महत्वाचे म्हणजे, गेमिंग बाजार अत्यंत झपाट्याने वाढत असतानाच Netflix ने हा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीमुळे लोक घरात कैद आहेत. यामुळेही गेमिंग मार्केट सध्या टॉपवर आहे.

द इंफॉर्मेशनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, यासंदर्भात Netflix ची गेमिंग कंपन्यांसोबतही चर्चा सुरू आहे. एवढेच नाही, तर Netflix अॅपलचे सब्सक्रिप्शन, जसे Apple Arcade प्रमाणे, गेमिंगसाठी अनेक कंपन्यांसोबत सल्ला-मसलत करत आहे. याच बरोबर, नेटफ्लिक्सच्या गेमिंगमध्ये जाहिरात नसेल. तर ही एक सब्सक्रिप्शनवर आधारित गेमिंग सर्व्हिस असेल, असेही म्हटले जात आहे.

NETFLIX चं नवं फीचर, आता आपणहून डाऊनलोड होणार तुमच्या आवडत्या मुव्हीज आणि शो

गेमिंग शिवाय, Netflix आपल्या व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिसमध्ये आणखी एक नवा प्लॅन जोडणार असल्याचेही समजते. याला ‘N-Plus', असे नाव देण्यात येईल. यात युधर्सना podcasts, कस्टम टीव्ही शो प्लेलिस्ट आणि बिहाइंड द सीन कंटेंट बघायला मिळेल. या सब्सक्रिप्शन प्लॅनसाठी कंपनी आपल्या काही यूझर्सकडून फीडबॅकदेखील घेत आहे.

नेटफ्लिक्सने नुकतीच इंटरनॅशनल ओरिजनल फिल्म्स विभागाचे काम पाहणाऱ्या निर्माता सृष्टि बहल आर्या यांची सुट्टी केली आहे. नेटफ्लिक्सच्या भारतातील कार्यालयाने यासंदर्भात संपर्क साधला असता याची पुष्टी केली आहे. 
 

Web Title: Netflix could enter video gaming industry soon all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.