Join us

Amazon Prime Video चं सबस्क्रिप्शन ५०० रुपयांनी महागलं; तर Netflix झालं स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 1:47 PM

OTT च्या जगतातील दोन बड्या प्लेअर्मध्ये म्हणजेच Amazon Prime Video आणि Netflix यांच्यात जबरदस्त स्पर्धा सुरू आहे.

OTT च्या जगतातील दोन बड्या प्लेअर्मध्ये म्हणजेच Amazon Prime Video आणि Netflix यांच्यात जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. Amazon ने मंगळवारपासून आपलं प्राइम व्हिडीओ सबस्क्रिप्शन ५०० रुपयांनी महाग केले आहे. या संधीचा फायदा घेत नेटफ्लिक्सने आपल्या प्लॅनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यासोबतच एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे.

किमतीतील बदलानंतर Amazon Prime Video चा सर्वात स्वस्त मासिक प्लान १७९ रुपयांचा झाला आहे. पूर्वी हा प्लॅन १२९ रुपयांना मिळत होता. दुसरीकडे, Netflix चे मासिक प्लॅन आता १४९ रुपयांपासून सुरू होतील, यापूर्वी या प्लॅनची किंमत १९९ रुपये प्रति महिना होते.Amazon ने गेल्या महिन्यात आपल्या Amazon Prime Membership चे नवे दर घोषित केले होते आणि त्यानंतर दरवाढ १४ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचं म्हटलं होतं. २०१७ नंतर कंपनीने ही दरवाढ केली आहे. अ‍ॅमेझॉनची मासिक प्राइम मेंबरशिप यापूर्वी १२९ रुपयांमध्ये उपलब्ध होती. ही आता दरवाढीनंतर १७९ रुपये झाली आहे. तर ३ महिन्यांसाठी आता ३२९ च्या ऐवजी ४५९ रुपये द्यावे लागतील. तर वार्षिक मेंबरशिप १,४९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही मेंबरशिप आधी ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होती. कंपनीने वार्षिक प्लॅनमध्ये ५०० रुपयांची वाढ केली आहे. 

नटफ्लिक्सनं कमी केले दरनेटफ्लिक्सच्या सबस्क्रिप्शनचे दर यापूर्वी अधिक होते. आथा कंपनीनं या प्लॅन्सच्या किंमतीत कमी केल्या आहे. कंपनीनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी १४९ रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. हा मोबाइल ओन्ली प्लॅन आहे. या अंतर्गत ग्राहकांना आपल्या मोबाइल किंवा टॅबवर कन्टेन्टचा आनंद घेता येईल. तर कंपनीचा दुसरा बेसिक प्लॅन हा १९९ रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना मोबाइल, टॅब, कम्प्युटर आणि टीव्हीवरही वेब सीरिज आणि चित्रपटांचा आनंद घेता येईल.

टॅग्स :अ‍ॅमेझॉननेटफ्लिक्स