Lokmat Money > बिझनेस न्यूज > Netflix नं लॉन्च केले रेडी-टू-ईट पॉपकॉर्न; कुठे आणि किती किंमतीत मिळणार, पाहा

Netflix नं लॉन्च केले रेडी-टू-ईट पॉपकॉर्न; कुठे आणि किती किंमतीत मिळणार, पाहा

Netflix Launched Popcorn : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) आता आपला रेडी-टू-बिंग टीव्ही शो ऑफर करणार आहे. इतकंच नाही तर ते पॉपकॉर्नची रेडी-टू-ईट बॅगची देखील विक्री करणारे. पाहा कुठे मिळणार हे पॉपकॉर्न.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:06 PM2024-06-21T12:06:07+5:302024-06-21T12:07:14+5:30

Netflix Launched Popcorn : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) आता आपला रेडी-टू-बिंग टीव्ही शो ऑफर करणार आहे. इतकंच नाही तर ते पॉपकॉर्नची रेडी-टू-ईट बॅगची देखील विक्री करणारे. पाहा कुठे मिळणार हे पॉपकॉर्न.

Netflix launches ready to eat popcorn See where and at what price partnership with popcorn indiana | Netflix नं लॉन्च केले रेडी-टू-ईट पॉपकॉर्न; कुठे आणि किती किंमतीत मिळणार, पाहा

Netflix नं लॉन्च केले रेडी-टू-ईट पॉपकॉर्न; कुठे आणि किती किंमतीत मिळणार, पाहा

Netflix Launched Popcorn : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) आता आपला रेडी-टू-बिंग टीव्ही शो ऑफर करणार आहे. इतकंच नाही तर ते पॉपकॉर्नची रेडी-टू-ईट बॅगची देखील विक्री करणारे. नेटफ्लिक्सनं यासाठी पॉपकॉर्न कंपनी पॉपकॉर्न इंडियानासोबत 'नाऊ पॉपिंग'साठी हातमिळवणी केली आहे. या अंतर्गत नेटफ्लिक्स-ब्रँडेड पॉपकॉर्नची नवीन रेडी-टू-ईट लाइन ऑफर केली जात आहे. नेटफ्लिक्सचे पॉपकॉर्न सध्या कल्ट क्लासिक चेडर केटल कॉर्न आणि स्वूनवर्थी सिनेमन केटल कॉर्न फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे.

पण महत्त्वाची बाब म्हणजे हे पॉपकॉर्न सध्या केवळ अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअर्समध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत. नेटफ्लिक्स नाऊ पॉपकॉर्नच्या आठ औंस (२२६ ग्रॅमपेक्षा जास्त) पिशवीची किंमत ४.४९ डॉलर (३७५ रुपयांपेक्षा जास्त) असल्याची माहिती याहू मुव्हीजच्या रिपोर्टमध्ये शॉपराइटच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

२०२० मध्ये Ben & Jerry’s सोबत डील

पॉपिंग नाऊ, नेटफ्लिक्स हा कंपनीचा पहिला फूड-संबंधित ब्रँडचा विस्तार नाही. २०२० मध्ये, नेटफ्लिक्सनं बेन अँड जेरीजशी करार केला होता, ज्यानं नेटफ्लिक्स आणि चिल्ड फ्लेवर्स (स्विट-सॉल्टी प्रेट्झेल स्वर्ल्स अँड फज ब्राउनीसह पीनट बटर आईस्क्रीम) सादर केलं. हे अजूनही स्टोअरच्या रॅकवर उपलब्ध आहे.

नेटफ्लिक्स हाऊस २०२५ मध्ये लॉन्च होणार

नेटफ्लिक्स २०२५ मध्ये नेटफ्लिक्स हाऊस नावाचे पहिले दोन पर्सनल एक्सपिरिअन्स व्हेन्यू सुरू करण्याची योजना आखत आहे. नेटफ्लिक्स हाऊसमध्ये नेटफ्लिक्सच्या सर्वात मोठ्या फिल्म्स आणि सीरिजच्या टायटल्सचे मर्चंडाईज, मुराल्स आणि स्कल्पचर असतील अशी अपेक्षा आहे. नेटफ्लिक्सच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर मॅरियन ली यांनी दिलेल्या माहितीनुसार नेटफ्लिक्स हाऊसमध्ये तुम्ही नियमितपणे अॅडव्हान्स्ड इमर्सिव्ह अनुभवांचा आनंद घेऊ शकता, रिटेल थेरपीचा आनंद घेऊ शकता आणि आपल्या आवडत्या नेटफ्लिक्स सीरिज आणि अनोख्या खाद्यपदार्थ, पेयांसह चित्रपट पाहू शकता.

Read in English

Web Title: Netflix launches ready to eat popcorn See where and at what price partnership with popcorn indiana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.