Join us

अवघ्या 100 दिवसांत नेटफ्लिक्सने गमावले दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स; युक्रेन युद्ध, कोरोनाचा मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:23 PM

यंदाच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबर्सची संख्या २२.१६ कोटी इतकी नोंदविण्यात आली. गेल्या वर्षीच्या अखेरच्या तिमाहीपेक्षा हा आकडा २ लाखांनी कमी आहे.

सॅन फ्रान्सिस्को : अवघ्या शंभर दिवसांत नेटफ्लिक्सने २ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स गमावले आहेत. या दशकात पहिल्यांदाच नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबर्सची संख्या इतकी कमी झाली आहे. कोरोना साथीमुळे जगभरात तर युक्रेन युद्धामुळे रशियात आमच्या सेवेला मोठा तडाखा बसला, असा नेटफ्लिक्सचा दावा आहे. 

यंदाच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबर्सची संख्या २२.१६ कोटी इतकी नोंदविण्यात आली. गेल्या वर्षीच्या अखेरच्या तिमाहीपेक्षा हा आकडा २ लाखांनी कमी आहे. यंदाच्या पहिल्या तिमाहीमध्ये नेटफ्लिक्सला १.६ अब्ज डॉलर इतके उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी याच कालावधीत १.७ अब्ज डॉलर इतके उत्पन्न होते. ही आकडेवारी बघता या कंपनीच्या उत्पन्नातही घट झाली आहे. हा सारा तपशील जाहीर होताच   नेटफ्लिक्सच्या समभागांच्या किमती २५ टक्क्यांनी कमी झाल्या. या कंपनीने म्हटले      आहे की, आम्हाला अपेक्षित असलेली उत्पन्नवाढ झालेली नाही.

कोरोनाच्या साथीमुळे गेल्या वर्षी व्यवसायावर परिणाम झाला होता. खिशाला परवडणारी ब्राॅडबँड सेवा मिळण्यास लागणारा वेळ, घरात नसलेल्या लोकांना सबस्क्रायबर शेअर करत असलेली खाती यामुळेही व्यवसायावर परिणाम झाल्याचा दावा नेटफ्लिक्सने केला आहे. 

सेवेचे दर कमी करण्याचा विचारव्यवसायाला लागलेली घसरण थांबविण्यासाठी नेटफ्लिक्स आता पासवर्ड शेअरिंगचे तसेच आपल्या सेवेचे दर कमी करण्याचा विचार करीत आहे. जाहिरातींचे प्रमाण वाढवून त्याद्वारे अधिक महसूल मिळविण्याचाही या कंपनीचा इरादा आहे. 

कोट्यवधी लोक बघतात फुकटात कार्यक्रम- जगभरात सुमारे १० कोटी कुटुंबांमधील लोक आपला मित्र      किंवा कुटुंबातील सदस्य यांचा पासवर्ड वापरून नेटफ्लिक्सचे कार्यक्रम फुकटात बघतात, असा या कंपनीचा दावाआहे. - अमेरिका, कॅनडामध्ये अशा फुकट्यांची संख्या जवळपास ३ कोटी आहे.  

टॅग्स :नेटफ्लिक्सयुक्रेन आणि रशियाकोरोना वायरस बातम्या