Lokmat Money > बिझनेस न्यूज > लाँच झालं नवं Aadhaar app; आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, काय आहे खास?

लाँच झालं नवं Aadhaar app; आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, काय आहे खास?

New Aadhaar App: आधारे हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे. आजकाल अनेक ठिकाणी आधारची गरज भासते. अनेक महत्त्वाच्या आणि सरकारी कामांसाठी आधार आवश्यक आहे.

By जयदीप दाभोळकर | Updated: April 9, 2025 10:02 IST2025-04-09T10:00:39+5:302025-04-09T10:02:13+5:30

New Aadhaar App: आधारे हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे. आजकाल अनेक ठिकाणी आधारची गरज भासते. अनेक महत्त्वाच्या आणि सरकारी कामांसाठी आधार आवश्यक आहे.

New Aadhaar app launched Now you won t have to provide a photo copy of Aadhaar anywhere what s special know features | लाँच झालं नवं Aadhaar app; आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, काय आहे खास?

लाँच झालं नवं Aadhaar app; आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, काय आहे खास?

New Aadhaar App: आधारे हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे. आजकाल अनेक ठिकाणी आधारची गरज भासते. अनेक महत्त्वाच्या आणि सरकारी कामांसाठी आधार आवश्यक आहे. दरम्यान, मोदी सरकारनं नवीन आधार अॅप (New Aadhaar app) लाँच केलं आहे. यामुळे युजर्सना त्यांच्या आधारसंबंधित माहितीची पडताळणी करण्यासाठी कोणत्याही फिजिकल कार्ड किंवा फोटो कॉपीची गरज भासणार नाही. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.

एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये, या अॅपच्या माध्यमातून फेस आयडी ऑथेंटिकेशन केलं जाईल आणि त्याचबरोबर युजर्सच्या कंटेंटसोबत डेटा सुरक्षितपणे शेअर केला जाईल, असं दिसून येत आहे. हे अॅप सध्या बीटा टेस्टिंगच्या टप्प्यात आहे, जे बेस व्हेरिफिकेशन सुधारण्याच्या दिशेनं काम करत आहे. यामुळे युजर्सची प्रायव्हसी वाढेल आणि त्याचबरोबर आधारचा गैरवापर ही टाळता येईल.

पत्नीसोबत ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; घरबसल्या दरवर्षी मिळतील ₹१,११,०००, रक्कमही राहिल सुरक्षित

कोणते आहेत महत्त्वाचे फीचर्स?

  1. युजर्स आता स्वत:च आवश्यक ती माहिती शेअर करू शकतात, जेणेकरून त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील.
  2. यूपीआय पेमेंटमध्ये जसा क्यूआर कोड स्कॅन केला जातो, त्याचप्रमाणे आधार व्हेरिफिकेशनही आता तितकंच सोपं होणार आहे.
  3. आता आधारची फोटोकॉपी किंवा स्कॅन करण्याची गरज भासणार नाही, सर्व काही अॅपवरूनच केलं जाईल.
  4. मोबाइल अॅपमध्ये चेहरा ओळखून लॉगिन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा आहे, ज्यामुळे सुरक्षा वाढते.
  5. हॉटेल, दुकानं किंवा ट्रॅव्हल चेकपोस्टवर आधारची प्रत देण्याची गरज भासणार नाही.
  6. ही प्रक्रिया १०० टक्के डिजिटल आहे आणि तुमची ओळख पूर्णपणे सुरक्षित असेल.
  7. या अॅपमुळे आधार कार्डशी संबंधित डेटाचा गैरवापर किंवा लीक होण्याचा धोकाही कमी होईल.
  8. आधार माहितीशी छेडछाड किंवा कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही.
  9. आधार व्हेरिफिकेशन अतिशय कमी वेळात आणि सोप्या पद्धतीनं केलं जाईल.
  10. युजर्सची प्रायव्हसी जुन्या पद्धतींपेक्षा अधिक मजबूत असेल.

Web Title: New Aadhaar app launched Now you won t have to provide a photo copy of Aadhaar anywhere what s special know features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.